शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

विशेष लेख: ठाणे पालिका कर्जाच्या विळख्यात सापडणार

By संदीप प्रधान | Updated: April 7, 2025 08:03 IST

वेगवेगळी देणी देण्यासाठी शासन पुन्हा बिनव्याजी कर्ज देईल का? एवढ्या मोठ्या रकमेची तजवीज महापालिका कुठून करणार? या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक |

ठाणे महापालिकेला भांडवली कामासाठी शासनाने बिनव्याजी ११५ कोटी रुपयांचे कर्ज दिले. या कर्जाची परतफेड पुढील ५० वर्षांत करायची आहे. या पैशांतून ठेकेदारांची शिल्लक देणी दिली जाणार आहेत. २०२३ पर्यंतच्या ठेकेदारांच्या देण्यांची रक्कम ११० कोटी रुपये आहे. याचा अर्थ देणेकऱ्यांचे पैसे दिल्यावर पालिकेच्या खिशात जेमतेम पाच कोटी उरतील. एखाद्याच्या आयुष्यात हेच घडले तर ती व्यक्ती दिवाळखोरीत निघाल्याचे मानले जाईल. ठाणे महापालिकेचेही तेच झाले आहे. 

ठाणे महापालिकेची आर्थिक घडी पार विस्कटलेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, ठेकेदारांची देणी आदी खर्च भागवताना महापालिकेची दमछाक होत आहे. राज्य शासनाने मागील अडीच ते तीन वर्षांत वेगवेगळ्या कामांकरिता निधी दिल्याने महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीची झाकली मूठ सव्वालाखाची राहिली. २०२३ पर्यंत ठेकेदारांनी केलेल्या कामांचे ११० कोटी शिल्लक असून २०२३ ते २०२५ या कालावधीत ठेकेदारांची देणी ३०० ते ३५० कोटींची आहेत. शिवाय मोठ्या प्रकल्पांच्या कंपन्यांची देणी १२०० कोटी आहेत. ४ हजार कोटींवरून ही कमी करत येथवर आली. यापूर्वी महापालिकेने घेतलेल्या कर्जापैकी ६० कोटींची परतफेड बाकी आहे. ताज्या अर्थसंकल्पात आणखी ६५ कोटींच्या कर्जाचे सूतोवाच आहे. वेगवेगळी देणी देण्यासाठी शासन पुन्हा बिनव्याजी कर्ज देईल का? एवढ्या मोठ्या रकमेची तजवीज महापालिका कुठून करणार? या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.

ठेकेदारांकडून केल्या जाणाऱ्या कामाच्या दर्जाबद्दल न बोललेलेच बरे. जेव्हा महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट होती तेव्हा महापालिकेत ‘गोल्डन गँग’ सक्रिय होती. आता थेट मंत्रालयातून आयुक्तांना आदेश येतात व कामे मंजूर केली जातात. वेगवेगळ्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना सांभाळण्यापेक्षा ठेकेदारांनाही मंत्रालय व महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘मिठाई’ देणे सोयीचे झाले आहे. कामे न करताच बिले काढली जात असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याचे सोयरसुतक कुणाला नाही. राज्य शासनाकडून महापालिकेला येणे असलेली रक्कम किमान दोन हजार कोटी रुपये आहे. ही रक्कम राज्य शासनाने दिली तर सर्व देणे भागवून काही रक्कम महापालिकेकडे शिल्लक राहील. राज्य शासनाने आपली देणी द्यायची नाही आणि महापालिकेला बिनव्याजी कर्ज देण्याचा मानभावीपणा दाखवायचा हे तर अधिक संतापजनक व अनैतिक आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे