शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिका : तरणतलाव थेट कंत्राटदाराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:41 IST

ठाणे पालिका : ताबा मिळण्याआधीच विकासकाने परस्पर चालवण्यास दिला

ठाणे : लोकमान्यनगर भागातील नव्याने विकसित करण्यात आलेल्या तरणतलावाचा मुद्दा गुरुवारी महासभेत पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला. विकासकाने टीडीआरच्या बदल्यात हा तरणतलाव विकसित करून दिला आहे. मात्र, तलावाचा ताबा पालिकेला मिळण्याआधीच विकासकाने परस्पर दुसऱ्या ठेकेदाराला हा तलाव चालविण्यासाठी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लोकमान्यनगर भागात नव्याने तरणतलाव विकसित करण्यात आला आहे. मागील महासभेतदेखील या तलावाच्या मुद्यावरून वादंग निर्माण झालेहोते.

गुरुवारी महासभेत पुन्हा या मुद्याला भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी हात घातला. याच मुद्याला धरून शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनीदेखील प्रशासनाला जाब विचारला. तरणतलाव भाड्याने देण्याचा करारनामा कशा पद्धतीने करण्यात आला, असा सवाल मुल्ला यांनी उपस्थित केला. त्यावर शहर विकास विभागाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तो वागळे इस्टेट विभागाला देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. त्याचे दर ठरविण्याचे, नियम, अटी आणि शर्ती ठरवण्याचे काम हे महासभेचे असताना परस्पर विकासकाला तरणतलाव चालविण्यासाठी कसा देण्यात आला, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावरून चांगलेच वादळ पेटले होते. दुसरीकडे स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक यांनी या ठिकाणी आता मुलांना चांगली संधी मिळाली आहे. नुसता विरोध करून काही उपयोग नाही, असेही त्यांनी सांगितले.सवाल करत प्रशसानाला धारेवर धरलेखाजगी संस्थेला या तलावाचा ठेका दिला आहे का, त्याचा प्रस्ताव महासभेत आला होता, असे अनेक सवाल करीत पुन्हा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. तरणतलावाला विरोध नाही. मात्र, ज्या पद्धतीने प्रशासनाने काम केले ते चुकीचे असून उद्या पालिका अशा पद्धतीने सुविधा भूखंड कोणालाही देईल, त्याला जबाबदार कोण, असा सवालही यावेळी करण्यात आला. परंतु, त्यावर प्रशासनाकडून योग्य ते उत्तर देण्यात आले नाही. अखेर, उत्तर मिळत नसल्याने नगरसेवकही शांत झाले.

टॅग्स :thaneठाणेSwimmingपोहणे