शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मनपा परिवहन समितीचा ४५३.७२ कोटींचा अर्थसंकल्प, साडेचार कोटीने बजेट केले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 03:08 IST

TMC News : ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या ४५८.१३ कोटींच्या अर्थसंकल्पानंतर त्यावर परिवहन समितीने चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी समितीने ४५३.७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या ४५८.१३ कोटींच्या अर्थसंकल्पानंतर त्यावर परिवहन समितीने चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी समितीने ४५३.७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. परिवहन प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात चार कोटी ४१ लाखांनी कमी करून तो सादर केला; परंतु यामध्ये परिवहनने महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे. दुसरीकडे परिवहनचे तिकीट दर बेस्टच्या धर्तीवर समान करण्याची हमीदेखील दिली आहे. त्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात येणार असल्याचे परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी स्पष्ट केले.ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर त्यावर साधकबाधक चर्चा केल्यानंतर सभापती जोशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीला तो सादर केला. यामध्ये परिवहन सेवेच्या इतर प्राधिकरणाचे किंबहुना बेस्टचे भाडे हे २५ रुपये असताना तेच भाडे ठाणे परिवहन सेवेचे ८५ रुपये आहे. इतर भाडेही इतर प्राधिकरणापेक्षा अधिक आहे. त्यामुळे एमएमआरडीए प्राधिकरणात प्रवासी सेवा देणाऱ्या विविध महापालिका परिवहन उपक्रमांचे भाडे समान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे, तर यापूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात ५० मिडी बस घेण्यासाठी २३ कोटींची तरतूद केली होती. ही रक्कम पालिकेकडून अनुदानास्वरूपात मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, तसेच परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बस दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, बेस्टमध्ये मुंबई आणि पुणे शहरामध्ये या बसकरिता ६० टक्के सबसिडी दिली जाते. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेनेही तशीच सबसिडी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. परिवहन सेवेची कार्यक्षमता वाढावी व आर्थिक स्थिती बळकट व्हावी यासाठी अंदाजपत्रकात सुचविल्याप्रमाणे महापालिकेकडून २०२०-२१ च्या सुधारित अंदाजपत्रकात वाढीव १४ कोटी ८४ लाख, तसेच २०२१-२२ या मूळ अंदाजपत्रकात महसुली कामाकरिता २०९.७७ कोटी व संचलन तुटीपोटी ९२ कोटी ६४ लाख, अशी ३०२ कोटी ४१ लाखांच्या अनुदानाची मागणी केली आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत काय निर्णय हाेताे याकडे लक्ष लागले आहे.  ठाणे महापालिकेने पुसली टीएमटीच्या तोंडाला पाने , मागितले ३०२.४१ कोटी, दिले १२२.९० कोटीठाणे : कोरोनामुळे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. परिवहनचा गाडा रूळावर येण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात यंदा २८४.६३ लाखांच्या अनुदानाची मागणी ठाणे महापालिकेकडे केली होती तर परिवहन समितीने यावर साधक-बाधक चर्चा करून या अनुदानाच्या रकमेत वाढ करून महापालिकेकडे ३०२.४१ कोटींची मागणी केली होती; परंतु महापालिकेने अर्थसंकल्पात परिवहनसाठी अवघे १२२.९० कोटी प्रस्तावित करून ‘परिवहन’च्या तोंडाला पाने पुसली आहेत.मागील महिन्यात ठाणे परिवहन प्रशासनाने परिवहन समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये परिवहनला कोरोनामुळे झालेल्या नुकसानीनंतर सावरण्यासाठी पालिका प्रशासनाकडून २८४.६३ कोटींच्या अनुदानाची मागणी केली होती. त्यामध्ये परिवहन कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांसह इतर देण्यांचादेखील समावेश होता. त्यानंतर आता शुक्रवारी परिवहन समितीने स्थायी समितीला सुधारित अर्थसंकल्प सादर केला आहे. यात परिवहन समितीने ३०२.४१ कोटींच्या अनुदानाची मागणी केली. मागील वर्षी परिवहनने २९१ कोटींची मागणी केली होती. परंतु, प्रत्यक्षात परिवहनला १३० कोटी मिळाले होते. त्यामुळे यंदा परिवहनने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७ कोटींची कमी मागणी केली होती. त्यातही परिवहन समितीने वाढ केली होती. परंतु, पालिकेने सादर केलेल्या २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकात परिवहन प्रशासनासाठी १२२.९० कोटींचे अनुदान प्रस्तावित केले आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणे