शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

TMT Budget 2022: ठाणे परिवहन सेवेचे ६२० कोटी ९० लाखांचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:38 IST

८१ बसेससह गृहनिर्माण व शहर विकास मंत्रलयाच्या नवीन योजनेनुसार २०० बस प्रस्तावित, महापालिकेकडे ४६० कोटी अनुदानाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : कोरोनामुळे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. मागील दोन वर्षापासून परिवहनचा गाडा खोल चिखलात रुतलेलाच दिसून आला आहे. अशातच परिवहन प्रशासनाने मंगळवारी २०२२-२३ चे ६२० कोटी ९० लाखांचे मुळ अंदाजपत्रक परिवहन समिती सभापती विलास जोशी यांना सादर केले. यामध्ये ८१ इलेक्ट्रीक बसेससह गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रलय यांनी प्रस्तावित केलेल्या एका नवीन योजनेनुसार २०० बसेस घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय परिवहन सेवेच्या जागांवर होर्डीग्जला परवानगी, चौक्यांवर जाहीरातीचे हक्क, अत्याधुनिक पध्दतीचे प्रवासी निवारे, परिवहनच्या जागेत एटीएम सेंटरची उभारणी, सौरउर्जा प्रकल्प, बसेसमध्ये एलईडी स्क्रीन, बस फे:या वाढविणो, आनंद नगर येथील मोकळ्या जागेत व्यापारी इमारत उभारणो आदी प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणा:यावर भर देण्यात आला आहे. दुसरीकडे परिवहनेने पालिकेकडे तब्बल ४६० कोटी ५४ लाखांच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मंगळवारी ऑनलाइन पध्दतीने अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये नव्या कोणत्याही योजनांचा समावेश नसला तरी परिवहनच्या जागांचा वापर करुन त्यातून उत्पन्न वाढीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिवहनच्या ताफ्यात सध्याच्या घडीला २२५ बसेस रस्त्यावर धावत आहेत. परंतु शहराची लोकसंख्या लक्षात घेता, ७५९ बसेसची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार येत्या वर्षभरात ८१ इलेक्ट्रीक बसेस परिवहनच्या ताफ्यात येणार आहेत. याशिवाय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रलय (केंद्रीय) यांनी प्रस्तावित केलेल्या एका नवीन योजनेनुसार बसेस खरेदी करणो, बस आगार विकसित करण्यासाठी अनुदान व पायाभुत सुविधा विकास करण्यासाठी अनुदान अंतर्गत परिवहन उपक्रमासाठी नवीन २०० बसेस घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. परिवहनच्या आगारात सीएनजी स्टेशन आहे. परंतु आता आगाराबाहेरील वाहनांसाठी देखील सीएनजी स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित असून त्यातून उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच वाहतुकी पासूनचे उत्पन्न यात प्रवासी भाडय़ातून १०३ कोटी ७३ लाख, इतर मिळकती पासूनचे १६०.१२ कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. दुसरीकडे महसुली जमामध्ये सवलती पोटी अपेक्षित धरण्यात आलेली रक्कम ही परिवहन उपक्रमाकडून दिव्यांग व्यक्ती तसेच जेष्ठ नागरीकांना दिलेल्या प्रवास सवलतीपोटी असून या आर्थीक बोजाची भरपाई महापालिकेने कल्याणकारी योजनेअंतर्गत परिवहनला द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महसुली खर्चाबाबतवाहन दुरुस्ती व निगा यासाठी ६ कोटी ७७ लाख, विधी विभागाकडील प्रलंबित विमा दावे २ कोटी १७ लाख, सेवा निवृत्ती निधी २८ कोटी २६ लाख ही रक्कम महापालिकेकडून अनुदानास्वरुपात अपेक्षित धरण्यात आली आहे. डिङोल व सीएनजी १५ कोटी ९३ लाख, सरकारी कर ४६ कोटी २३ लाख, कर्मचारी थकबाकी देणीबाबत विचार केल्यास २०२१ अखेर सातवा वेतन आयोग लागू केल्यावर द्यावी लागणारी फरकाच्या रकमेसह एकूण थकीत देणी १७९ कोटी ५७ लाख एवढी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी १२४ कोटी ४४ लाख महापालिकेकडून अनुदान स्वरुपात मिळावी असे अपेक्षित धरण्यात आले आहे.

दृष्टीक्षेपातील उत्पन्न वाढीबाबतचे स्त्रोतपरिवहन सेवेच्या जागांवर होर्डीग्जला परवानगी देण्याची प्रक्रिया, परिवहन सेवेच्या चौक्या जाहीरातीचे अधिकार देऊन विकसित करणो, अत्याधुनिक पध्दतीचे प्रवासी निवारे विकसित करणो, परिवहनच्या जागांमध्ये एटीएम सेंटरची उभारणी करुन उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणो, बस आगारांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवून ऊज्रेमध्ये बचत, बसमध्ये एलईडी स्क्रीन लावून जाहीरातीद्वारे उत्पन्न, बस फे:या वाढविण्याबाबत वाहतुक पोलीस यांच्याशी समन्वय साधून वाहतुक कोडीं सोडविण्याबाबत उपाय योजना करुन बसेसच्या फे:या वाढविणो, आनंद नगर येथील मोकळ्या जागेत महापालिकेच्या सहकार्याने निवासी व व्यापारी तत्वावरील इमारती बांधून बीओटी तत्वावर देऊन त्यातून १०० कोटींच्या उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.

प्रवासी संख्या वाढविण्याची उपाययोजनाशहरातील प्रवासी हा मुख्यत्वे मध्य रेल्वेने ठाणो स्टेशन येथे येऊन पुढे इच्छीत स्थळी जातो. सॅटीसवरुन १०२ मार्गावर प्रवासी सेवा पुरविली जाते. सॅटीस येथे आलेल्या प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मेगाफोनद्वारे सोडण्यात येणा:या बसेस बाबत माहिती देण्यात येते. त्यानुसार येथे पर्यवेक्षक कर्मचा:याची नियुक्ती, शहरातील विविध बसथांब्यावर स्मार्टसिटी योजनेअंतर्गत हे थांबे डिजीटल करण्यात येणार आहेत. त्यावर बस आगमनाची वेळ दर्शविण्यात येणार आहे, आरटीओशी समन्वय साधून अवैध्य रित्या वाहतुक करणा:या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न त्यातून प्रवासी वाढविण्यावर भर, परिवहनच्या ताफ्यात अधिक मिडी बसेस घेऊन, त्या छोटय़ा मार्गावर सोडण्याचा विचार, खाजगी वाहनांचा वापर करण्याऐवजी परिवहनच्या बसेसचा वापर करण्यासाठी डिजीटल माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात येणार आहे. अधिकाधिक इलेक्ट्रीक बस खरेदीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.  

महापालिकेकडून हवयं ४६०.५४ कोटींचे अनुदानठाणे परिवहनने मागील वर्षी महापालिकेकडून ३०२ कोटी मागून पालिकेने केवळ ११५ कोटीच परिवहनला मिळाले होते. असे असतांना आता २०२२-२३ साठी परिवहनने पालिकेकडून ४६०.५४ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यापैकी महसुली व भांडवलीसह ३७० कोटी ८ लाख व संचलन तुट अनुदानापोटी ९० कोटी ४३ लाख इतक्या अनुदानाची ठामपाकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे हे अनुदान मागत असतांनाच क्रीसील या संस्थेच्या अहवालाचा दुजोरा देत शहर बस सेवा ही महापालिकेने स्वत: चालवावी अथवा, खाजगी कंपनी मार्फत चालविण्यास दिली तर त्यातून तोटाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे