शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या १०४ शाळा इमारतींमधील २०० वर्गखोल्या होणार डिजीटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 15:55 IST

ठाणे महापालिकेच्या १०४ शाळा इमारतींमधील तब्बल २०० वर्गखोल्या आता डिजीटल होणार आहे. ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी देखील आता स्मार्ट ठाण्याबरोबर या निमित्ताने स्मार्ट होणार आहेत.

ठळक मुद्देपहिली ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार फायदामराठी माध्यमाच्या ९१ शाळांचा समावेश

ठाणे - ठाणे महापालिका शिक्षण मंडळाने आता विद्यार्थ्यांनी डिजीटलचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे ठाणे शहर स्मार्टसिटीकडे झेप घेत असतांना आता महापालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी देखील स्मार्ट होणार आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेतील पहिले ते दहावी पर्यंतच्या १०४ शाळा इमारतींमधील २०० वर्गखोल्या डिजीटल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.           राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची सुरवात जून २०१६ पासून झाली. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा या ५० टक्के व २५ टक्के प्रगत करणे हा होता. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागासाठी केआरए अंतर्गत उद्दीष्ट देखील दिले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ३५० शिक्षकांना टेक सेव्हीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच वर्गातील मुलांचे संकल्प निहाय माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शिक्षण सहज व सोपे व्हावे म्हणून या संदर्भातील अ‍ॅप बनविण्याचे कामही प्रगतीपथावर सुरु आहे. त्यानुसार आता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजीटलद्वारे सहज शिक्षण कसे घेता येऊ शकते याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्याच माध्यमातून आता डिजीटल वर्ग सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या २०० वर्गखोल्या डिजीटल होणार आहे. यामध्ये पहिली ते चवथी पर्यंतच्या शाळांना ८ संच यामध्ये मराठी माध्यमाच्या ६, इंग्रजी माध्यमाच्या ०२ शाळांचा समावेश आहे. तर १ ली ते ८ वी पर्यंतच्या मराठी माध्यमाच्या ७५ शाळा, इंग्रजी माध्यमाच्या ०५ शाळांसाठी एकूण १६० संच, तर ९ वी १० वीच्या मराठी माध्यमाच्या १०, इंग्रजी माध्यम ३, उर्दू माध्यम ३ असे एकूण ३२ संच देण्यात येणार आहेत. असे एकूण मिळून २०० संच उपलब्ध करुन देण्यात येणार आाहेत. या संचात एलईडी टीव्ही, संगणक, वेब कॅमेरा, एव्हुलेशन कीट आणि ५० विद्यार्थ्यांसाठी रिमोट, किबोर्ड, माऊस, आदींसह इतर सुविधांचा त्यात समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रगती डाटाबेसही डिजीटल तयार करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ६० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाSchoolशाळा