शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या होणार डीजीटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:50 IST

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने आखलेल्या कार्यक्रमानुसार आता ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे होणार मुल्यमापन१४८ संगणक आणि १३४ प्रिंटर खरेदी केले जाणार

ठाणे - ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. राज्य पातळीवर होणाऱ्या  शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला पहिल्या तीन क्र मांकात स्थान मिळवून देणे तसेच दहावी पर्यंत मुलींच्या गळतीचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणणे यासाठी राज्य शासनाने विविध कार्यक्र म हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील हे पाऊल उचलले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला काही उद्दीष्ट दिली आहेत. त्यामध्ये सर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा या अनुक्रमे ५०टक्के आणि २५ टक्के करणे या उद्दीष्टाचा समावेश आहे. याशिवाय, माध्यमिक शाळा २० टक्के प्रगत करणे, जिल्ह्यातील किमान ३०० शाळांना ‘अ’ दर्जामध्ये आणणे, मोबाईल अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे, दप्तराचे ओझे कमी करणे, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदींचा त्यात समावेश आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या एकूण १२९ प्राथमिक शाळा असून त्यापैकी २१ शाळेतील १४५ वर्ग डिजीटल करण्यात येणार आहेत. या वर्ग खोल्या ‘ब’ श्रेणीमध्ये असल्याने त्यांना ‘अ’ श्रेणीत आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. उर्वरीत वर्ग खोल्या टप्याटप्याने डिजीटल करण्याचा मानस असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्र मासाठी दोन कोटी दोन लाख रु पये इतका खर्च अपेक्षित असून त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यामध्ये अप्रगत शाळांनी प्रगत झालेल्या शाळांना भेटी देणे, राज्यातील प्रत्येक वर्ग डिजीटल करणे, शंभर टक्के शिक्षकांना तंत्रस्नेही करणे, शंभर टक्के संकल्पनांवर ई-साहित्य तयार करणे, एक स्टेप या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे, शाळा सिद्धी या पोर्टलवर स्वमुल्यमापन तसेच इतर कार्यक्रमांचा यात समावेश आहे. या कार्यक्र मांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिका शिक्षण विभागाने शाळांसाठी संगणक आणि प्रिंटरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १४८ संगणक आणि १३४ प्रिंटर खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाSchoolशाळा