शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी एक कोटी घेतल्यानेच हॉटेल व्यवसायिकांना १५ दिवसांची मुदतवाढ, मनसेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:43 IST

शहरातील हॉटेल व्यवसायिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ पालिकेतील काही अधिकाऱ्यांना एक कोटी मिळाल्यानेच हॉटेलवाल्यांना मुदतवाढ दिल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ न देता कारवाईची मागणीमहापालिका आणि पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

ठाणे : मुंबईत घडलेल्या आगीच्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने फायर एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४५८ हॉटेल, पबला नोटिसा बजावल्या होत्या. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या सर्व आस्थापना सील करण्याचे आदेश दिले होते. परंतु, अवघ्या एका दिवसातच हॉटेल व्यवसायिकांनी आयुक्तांची भेट घेऊन थेट १५ दिवसांची मुदतवाढ मिळवली. परंतु पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना १ कोटी मिळाल्यानेच त्यांना मुदतवाढ दिल्याचा आरोप महाराष्ट नवनिर्माण सेनेने केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.मनसेने केलेल्या या आरोपामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहरातील ४५८ हॉटेल आस्थापना सील करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानंतर झोपी गेलेले हॉटेल व्यवसायिक जागे झाले आणि त्यांनी गुरुवारी रात्रीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची तर शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. तब्बल दोन तास त्यांची आयुक्तांबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, सहा महिन्यापूर्वी मुदतवाढ दिल्यानंतरही त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता अवघ्या १५ दिवसात ते कागदपत्रांची पूर्तता कशी करू शकतात असा सवाल मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. शिवाय त्यांना मुदतवाढ द्यावीच कशासाठी असा हल्लाबोलही त्यांनी चढविला आहे.दरम्यान मंगळवारी त्यांनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्तांची भेट घेऊन दिलेली मुदतवाढ रद्द करावी अशी मागणी केली. केवळ महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना एक कोटी रुपये हॉटेल व्यवसायिकांकडून मिळाल्यानेच ही मुदतवाढ दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधीत अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMNSमनसे