शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

पर्यावरणभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 3:19 PM

पर्यावरणभिमुख गणेशोत्सवासाठी यंदाही ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी विसर्जन घाटांची निर्मिती, गणेश मुर्ती स्वीकृती केंद्र, सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर आदींसह इतर सोई सुविधा पालिकेने उपलब्ध केल्या आहेत.

ठळक मुद्देविसर्जन घाटांवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर२००९ पासून महापालिका राबवतेय पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना

ठाणे - पर्यावरणभिमुख गणेशोत्सव’ ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात रुजवून राज्यामध्ये नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ठाणे महापालिकेची यंत्रणा याही वर्षी पर्यावरण भिमुख गणेशोत्सवासाठी सज्ज झाली आहे. या वर्षीही पर्यायी विसर्जन व्यवस्थेसाठी कृत्रीम तलावांची निर्मिती केली असून नागरिकांनी महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.                   पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठीठाणे महापालिका २००९ पासून विविध स्वरुपाच्या उपाययोजना करीत असून यामुळे शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. पारिसक रेतीबंदर व कोलशेत येथे विसर्जन महाघाट हिंदू संस्कृतीप्रमाणे श्री गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मुर्तींबरोबरच ५ फुट आणि त्यापेक्षा मोठया आकाराच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने आरती स्थाने आणि निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले विसर्जन घाट भरती आणि ओहोटी लक्षात घेऊनच बांधण्यात आले आहेत.*कृत्रीम तलावांची निर्मितीगणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावाच्या बाजूला ५० बाय ३० फुटाचे आणि १० फुट खोलीचे दोन कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तर उपवन येथे पालायदेवी मंदिराशेजारी ४७ बाय १६ फुट लांब आणि अडीच मीटर खोलीचा व आंबेघोसाळे तलाव येथे ३० बाय ६० फुट या आकाराचा, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे कृत्रीम तलाव व खारेगांव येथेही कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.* गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रेज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिकेने मडवी हाऊस, वर्तकनगरमध्ये व्यंकटेश मंदीर, चिरंजीवी हॉस्पीटल, पोखरण रोड नं. २ येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.१६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, पाईप लाईन ब्रीज, १६ नं. पाईपलाईन ब्रीज, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रांवर प्राप्त होणाºया सर्व गणेश मुर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.*विशेष स्वयंसेवकांची नियुक्तीनेहमीप्रमाणे दीड दिवसाचा, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जना दिवशी सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अिग्नशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरूद्ध अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे ५०० प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.*सी.सी.टीव्ही कॅमेरे व विद्युत व्यवस्थागणेशाच्या विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रीम तलावांच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आवश्यक ती विद्युत व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाGanpati Festivalगणेशोत्सव