शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या यंत्रणेकडून सोयीस्कर दुर्लक्ष, वाहत्या ड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे विवाह नोंदणीकरणारे दांपत्य हैराण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:38 IST

नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व शक्तीनीशीजोरदार प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांकडूनही त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण या महापालिकेची यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून वाहतेड्रेजचे काम करण्यासाठी स्वत:हून पुढे येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव दिसून आले. सुमारे एक महिन्यांपासून मासुंदा तलावजवळील भर रस्त्यात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. येथून भरधाव वेगाने येणाºया वाहनांकडून ते अंगावरही उडत आहे. याशिवाय जीव घेणी दुर्गंधी असल्यामुळे सेन्ट जॉन बाप्पष्ठीस शाळेच्या विद्यार्थ्यांसह तलावाच्या काठी फिरणाºया नागरिकाना त्रास होत आहे.

ठळक मुद्देवाहत्या ड्रेनेजचा त्रास नोंदणी करण्यासाठी येणारे नवदांम्पत्य व त्यांच्या नातेवाईकाना होत आहेसेन्ट जॉन बाप्पष्ठीस शाळेच्या विद्यार्थ्यांसह तलावाच्या काठी फिरणा-या नागरिकाना त्रासलेखी निवेदन मोने यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना देऊन गांभीर्य निदर्शनात आणून दिले

ठाणे : स्वच्छेसाठी देशात युध्दपातळीवर जनजागृती सुरू आहे. मात्र स्मार्ट सीटीच्या उंबरठ्यावरील ठाणे महापालिकेच्या यंत्रणेकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे, याचे वास्तव मासुंदा तलावाजवळील रस्त्यावर वाहणाऱ्याड्रेनेजमुळे उघड होत आहे. याड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे येथील विवाह नोंदणीसाठी येणाऱ्या नवदाम्पत्यांसह विद्यार्थी व तलावा काठी फेरफटका मारणारे हैराण आहेत.नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व शक्तीनीशीजोरदार प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांकडूनही त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण या महापालिकेची यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून वाहतेड्रेजचे काम करण्यासाठी स्वत:हून पुढे येण्यास टाळाटाळ करीतअसल्याचे वास्तव दिसून आले. सुमारे एक महिन्यांपासून मासुंदा तलावजवळील भर रस्त्यात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. येथून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांकडून ते अंगावरही उडत आहे. याशिवाय जीव घेणी दुर्गंधी असल्यामुळे सेन्ट जॉन बाप्पष्ठीस शाळेच्या विद्यार्थ्यांसह तलावाच्या काठी फिरणाऱ्या नागरिकाना त्रास होत आहे.विवाह नोंदणी निबंधक कार्यालयही येथे असल्यामुळे या वाहत्या ड्रेनेजचा त्रास नोंदणी करण्यासाठी येणारे नवदांम्पत्य व त्यांच्या नातेवाईकाना होत आहे. गडकरी रंगायतनच्या प्रेक्षकानाही त्याचा त्रास होत आहे. याशिवाय या ड्रेनेजचे साठलेले पाणी जवळच्या मासुंदा तलावत जाण्याची शक्यता येथील प्रथमदर्शी जेष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी व्यक्त केली. या वाहत्याड्रेनेजच्या पाण्यास वेळीच आळा घालण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या संबंधीत यंत्रणेला पाचारण केले. पण त्यांनी ड्रेज तात्पुरते साफ केले. पण ते तेथून जाताच पुन्हा रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे. याकडे लक्ष केंद्रीत करून गांभीर्य लक्षात आणून देणारे लेखी निवेदन मोने यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना देऊन गांभीर्य निदर्शनात आणून दिले आहे.सेन्ट जॉन बाप्पष्टीस चर्चच्या समोरच मासूंदा तलावाच्या कठड्याचे दुरूस्तीचे काम चालू आहे. तेथेच बाजूला हे दोन ड्रेनेज वाहत आहेत. हेवी ट्रॅफिक असलेल्या या रस्त्यावर विवाह निबंधकाचे कार्यालय आहे . येथे विवाह नोंदणी करीता येणाऱ्या नागरिकांना याच पाण्यातून मार्गक्रमण करून दुर्गंधीस सामोरे जावे लागते आहे. तेथे लावलेली खबरदारीचा फलकही अत्यंत बेजबाबदार भाषेत आहे. हे काम किती दिवस चालणार, या कामाचा कार्यादेश क्र मांक काय आहे, कोण कंत्राटदार हे काम करीत आहे, कीती खर्च अपेक्षीत आहे, आपत्कालीन परिस्थितीत कोणास संपर्करावा, महापालिकेकडून कोण अभियंता या कामावर देखरेख करीत आहे , त्याचा भ्रमणध्वनी क्र मांक आदी माहीती देणारा फलक तेथे लावण्यात आलेला नाही...........

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcity chowkसिटी चौकStudentविद्यार्थी