शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजन विचारे यांना ठाणे महापालिकेचा दणका, शिंदे-ठाकरे वाद उफाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:12 IST

पत्नीच्या संस्थेला दिलेली वास्तू काढून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नाममात्र दराने विविध संस्थांना दिलेल्या जागा, वास्तू परत ताब्यात घेण्यास ठाणे  महापालिकेने सुरुवात केली आहे. यापुढे या मालमत्ता संस्थांना देताना रेडिरेकनरच्या दराने भाडे आकारण्यात येणार आहे. राजकीय वरदहस्तामुळे अनेक वर्षांपासून ही कार्यवाही लटकली होती. या मोहिमेची सुरुवात ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या एका संस्थेला दिलेल्या वास्तूपासून झाली आहे. विचारे हे ठाकरे समर्थक असल्यामुळे ही कारवाई केली का, असा सवाल शिवसैनिक करीत आहेत. याच न्यायाने इतर वास्तू ताब्यात घेणार का, असा सवालही केला जात आहे. आजवर नाममात्र दराने देण्यात आलेल्या सर्वच वास्तू टप्प्याटप्प्याने महापालिका ताब्यात घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यानिमित्ताने शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. 

आमदार, खासदार निधीतून शहरात समाज मंदिरे, व्यायामशाळा उभारण्याकरिता या विविध संस्थांना नाममात्र भाडेतत्त्वावर भूखंड देण्यात आले आहेत. त्यातील बहुतेक संस्थांना राजकीय वरदहस्त लाभलेला आहे. एका याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने अशा वास्तूंना रेडिरेकनरनुसार दर आकारण्याचे निर्देश काही वर्षांपूर्वी सर्व महापालिकांना दिले होते. ठाणे महापालिकेच्या महासभेत स्वारस्य अभिव्यक्ती सूचनानुसार संस्थांना देण्यात येणारी सवलत कायम असावी, असा ठराव करण्यात आला. या ठरावाला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. ठाणे पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने सिद्धेश्वर तलाव परिसरातील निसर्ग संस्कार भवन ही तळ अधिक एकमजली वास्तू ताब्यात घेतली. त्यासोबतच कोलबाड येथील तळ अधिक एक मजली नागेश्वर हेल्थ अँण्ड स्पोर्ट्स क्लबला भाडे कराराने दिलेल्या वास्तूची मुदत संपल्याने तीही ताब्यात घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले. पालिकेने सुडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचा आरोप नंदिनी यांनी केला.

नव्याने भाडेकरार करणारआमदार व खासदार निधीतून बांधण्यात आलेले समाज मंदिर व व्यायामशाळा या वास्तू भाडेतत्त्वावर विविध संस्थांना दिल्या असून त्यांची मुदत संपलेली आहे. यासाठी नव्याने भाडेकरार करण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाकडून ईओआय काढण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त महेश आहेर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाEknath Shindeएकनाथ शिंदे