शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज, २२ अलगीकरण केंद्रात देणार १२ हजार बेड्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:09 IST

Coronavirus Pandemic : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी खबरदारी म्हणून पालिकेनं कसली कंबर

ठळक मुद्देकोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी खबरदारी म्हणून पालिकेनं कसली कंबर

ठाणे  :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणो महापालिका आता सज्ज झाली आहे. त्यानुसार आता गृहविलगीकरण बंद करण्यात आले असल्याने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका २२ अलगीकरण केंद्र सज्ज करणार आहे. त्याठिकाणी तब्बल १२ हजार बेड्सची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच रुग्णालयात ५४४८ च्या वर बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.ठाणे शहरात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. त्यानुसार आता शहर देखील पूर्वपदावर येऊ लागले आहे. परंतु येत्या दोन ते तीन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने पार्कीग प्लाझा येथे लहान मुलांसाठी बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्होल्टास, बुश कंपनी येथील कोविड सेंटरही सुरु करण्याची तयारी पालिकेने केली आहे. तसेच १० कोटींचा ३५० प्रकारांचा औषध साठादेखील पालिकेने खरेदी केला आहे. ऑक्सिजन प्लान्ट उभारणी बरोबर इतर संस्थांकडून ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करुन घेण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. दरम्यान काही दिवसापूर्वीच राज्यातील १८ जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद करण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पालिकेने आता तयारी सुरु केली आहे.२२ अलगीकरण केंद्रांची तयारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असतानाही रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे तिसरी लाट आल्यास नेमकी परिस्थिती कशी असेल याचा अंदाज पालिकेलादेखील नाही. परंतु तरीदेखील आता गृहविलगीकरण बंद करण्यात आल्याने पालिकेने पुन्हा तिसऱ्या लाटेसाठी २२ अलगीकरण केंद्र सुरु करण्याची तयारी पालिकेने केली आहे. हे केंद्र जून अखेर पर्यंत सज्ज ठेवले जाणार आहेत. यामध्ये शाळा, महापालिकेच्या इमारती, रेंटलच्या इमारती, आदींचा समावेश असणार आहे. त्यानुसार या ठिकाणी तब्बल १२ हजार बेड्स निर्मिती केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच त्या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून १५ टीम सज्ज केल्या जाणार आहेत. याशिवाय लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ५ हजार ४४८ बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यातही आता व्होल्टास आणि बुश कंपनी येथील कोवीड सेंटरचाही भरणा पडणार आहे. एकूणच कोरोनाची तिसरी लाट आल्यास रुग्णांना बेड, औषधे, ऑक्सिजनचा साठा कमी पडू नये यासाठीची तयारी पालिकेने दोन महिने आधीपासूनच केल्याचे दिसून आले आहे.पालिका सज्जकोरोनाच्या तिसऱ्या  लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे  महापालिका सज्ज आहे. मुबलक औषधसाठा, ऑक्सिजन, पीपीई कीट, लहान मुलांसाठी बेड, तसेच गृहविलगीकरण बंद करण्यात आल्याने २२ अलगीकरण केंद्राच्या माध्यमातून १२ हजार बेड अशा रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. गणेश देशमुख - अतिरिक्त आयुक्त, ठामपा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका