शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या वतीने फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 16:31 IST

फेरीवाला धोरणाची आता खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने पहिल्या टप्यातील फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली आहे.

ठळक मुद्देनौपाड्यातून फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवातपहिल्या टप्यात ५१४१ फेरीवाल्यांची नोंदणी

ठाणे - मागील कित्येक वर्षापासून रखडलेले फेरीवाला धोरण आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्यातील सर्वेक्षणात ज्या ५१४१ फेरीवाल्यांची नोंदणी झाली आहे. त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेण्यात आला होता. त्यानुसार आता नौपाड्यातून याला सुरवात झाली आहे. या भागातील फेरीवाल्यांना आता व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच येत्या काही दिवसात शहरातील इतर ठिकाणाच्या फेरीवाल्यांना देखील अशाच पध्दतीने नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.                   महापालिकेने स्थापन केलेल्या १६ सदस्यीय फेरिवाला समितीची बैठक तीन वर्षानंतर पार पडली. फेरीवाल्यांमध्ये या धोरणाबाबत विश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्या व्यवसाय पध्दतीला शिस्त लागावी तसेच फेरीवाल्यांचा सर्वसामान्यांना उपद्रव होऊ नये यासाठी फेरीवाला क्षेत्रांची आखणी करून नोंदणीकृत फेरीवाल्यांना अधिकृतरित्या व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी चर्चा बैठकीत झाली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या ५१४१ फेरीवाल्यांना सहा महिन्यांसाठी तात्पुरते ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी नियमानुसार जागा ठरवून व्यवसाय करण्याची मुभा देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. दरम्यान दुसऱ्या  टप्यात शिल्लक राहिलेल्या फेरीवाल्यांचा जागेवर जाऊन बायोमेट्रीक पध्दतीने सर्व्हे केला जाणार असल्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले होते.      ठाणे महापालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरवात होती. आता फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे. या सर्व्हेनुसार शहरात सुमारे ७ हजारांच्या आसपास फेरीवाले आहेत. दरम्यान आता खºया अर्थाने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी नौपाडा प्रभाग समितीमधील फेरीवाल्यांना टप्याटप्याने व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे नौपाड्यातील फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून मागील कित्येक महिने यासाठी आंदोलन देखील केले होते. आता त्यांच्या आंदोलनाची फलीत म्हणूनही याकडे पहावे लागणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त