शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिकेच्या भूखंड विक्री घोटाळ्याची होणार चौकशी; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 06:17 IST

पालिकेच्या तत्कालीन व विद्यमान आयुक्तांनी सरकारची मान्यता नसतानाही काही मोजक्याच विकासकांना बांधकाम परवानगी दिली आहे. मात्र आता ही बांधकामे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना वापर परवाना दिला जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणे महापालिकेने केवळ ६९ कोटी रुपयांमध्ये पालिकेचे आठ भूखंड विकासकांना दिले होते. या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे केली. त्यावर या घोटाळ्याची विभागीय चौकशी करण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

सरनाईक यांनी ठाणे महापालिकेतील घोटाळ्याकडे लक्ष वेधले. ठाणे महापालिकेने २०१७ मध्ये सर्वसाधारण सभेच्या ठरावाद्वारे विकासकांनी हस्तांतरित केलेले सुविधा भूखंड रेडीरेकनर दराच्या १२५ टक्केप्रमाणे मूल्य आकारणी करून त्याच विकासकांना परत करण्याचा निर्णय घेतला. पालिका आयुक्तांनी या ठरावाच्या आधारे कॉसमॉस हॅबिटॅट, मे. राजलक्ष्मी डेव्हलपर्स, मे. रोमा डेव्हलपर्स, मे. सेठ डेव्हलपर्स, मे. उन्नती, जय प्रॉपर्टी, दामजी श्यामजी रिअल प्रा. लि. आदींना एकूण १७ हजार ९२३.६३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड ६९ कोटींना परत दिले, तर मॅन हटन, पॅलेशिया, गार्डन कोर्ट, आकाश बिल्डकॉर्प एलएलपी, पुराणिक बिल्डर्स यांनी दाखल केलेले प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

सरकारच्या धोरणानुसार पालिकेच्या मालकीची मालमत्ता बाजारभावापेक्षा कमी दरात देता येत नसतानाही पालिकेने मात्र रेडीरेकनर दराच्या १२५ टक्के दराने हे भूखंड दिले. याला सरकारची परवानगी नसल्याचे सांगत विद्यमान आयुक्तांनी या प्रकल्पांना वापर परवाना देण्यास नकार दिला आहे. सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांवरील चर्चेदरम्यान शिंदे यांनी ही घोषणा केली.

किती नुकसान झाले?nपालिकेच्या तत्कालीन व विद्यमान आयुक्तांनी सरकारची मान्यता नसतानाही काही मोजक्याच विकासकांना बांधकाम परवानगी दिली आहे. मात्र आता ही बांधकामे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना वापर परवाना दिला जात नाही.nत्यामुळे या बांधकामांवर कारवाई करावी किंवा अन्य प्रस्तावांना मान्यता द्यावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली. त्यावर या निर्णयामुळे पालिकेचे किती नुकसान झाले याची चौकशी करून उचित निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpratap sarnaikप्रताप सरनाईकThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका