शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका खोदणार शहरात यंदा पुन्हा ६० कुपनलिका, पाणी कपातीवर मात करण्यासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:44 IST

पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी होऊ नये या उद्देशाने ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करण्यावर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, मागील वर्षी २४८ कुपनलिका खोदण्यात आल्यानंतर आता पुन्हा नव्याने ६० कुपनलिका खोदणार आहे.

ठळक मुद्दे९९ लाख ९७ हजारांचा खर्च अपेक्षितनव्याने तयार झालेले आणि तयार होणाऱ्या गार्डनसाठी केला जाणार वापर

ठाणे : मुबलक पाणी असतांनाही आजही ठाणे महापालिकेला पाणीकपात करावी लागत आहे. पावसाने पाठ फिरविल्यास ठाणेकरांना नैसर्गिक स्त्रोतांपासून पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने मागील दोन वर्षांपासून महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील शहरातील विहिरी आणि कुपनलिकांच्या दुरुस्तीसह नव्याने कुपनलिका खोदण्याचे कामही सुरूकेले आहे. त्यानुसार मागील वर्षी २४२ कुपनलिका                                  नव्याने खोदल्यानंतर यंदा ६० कुपनलिका खोदण्यासंदर्भाचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.महापालिका हद्दीत ९०७ कुपनलिका वापरात आहेत. शहराला आजघडीला सुमारे ४७० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या हे पाणी मुबलक असतांनादेखील ठाणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलावार पुन्हा एकदा उभी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मुबलक पाऊस झाला असला तरी एमआयडीसी आणि स्टेमकडून पाणीकपातीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही शक्यता लक्षात घेऊन ठाणेकरांना लागणारे पाणी नैसर्गिक स्त्रोतापासून उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने शहरातील अस्तित्त्वात असलेल्या कुपनलिका आणि विहिरींच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. महापालिका हद्दीत आजघडीला ९०७ कुपनलिका आहेत. २०१० मध्ये हा आकडा ८१३ च्या घरात होता. आता त्यात वाढ झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. या कुपनलिकांमध्ये ८५ कुपनलिका या पॉवर पंपावर चालत आहेत. त्यांच्या पाण्याचा वापरदेखील उद्याने, गार्डन, शौचालये, रस्ते सफाई आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वापर केला जात आहे.दरम्यान मागील वर्षी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २४२ कुपनलिका नव्याने खोदल्या असून त्यांचा वापर इतर कामांसाठी केला जात आहे. तर यंदादेखील ६० कुपनलिका खोदण्यात येणार असून यासाठी ९९ लाख ९७ हजार १८४ रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. यामध्ये ५० पॉवर पंपावर चालणाऱ्या आणि १० हॅन्डपंपवर चालणाºया कुपनलिका असणार आहेत. या कुपनलिकांचा वापर नव्याने तयार झालेले आणि तयार होत असलेल्या गार्डनसाठी केला जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी