कागदी घोड्यांमुळेच हॉटेल व्यावसायिकांना मिळणार मुदतवाढ, ४२६ आस्थापनांनी घेतले फायर एनओसीचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 04:14 PM2018-01-15T16:14:03+5:302018-01-15T16:16:58+5:30

पुढील १५ दिवसात फायर एनओसी सादर करण्यासाठी हॉटेल आस्थापनांनी दिलेली मुदत येत्या शनिवारी संपणार आहे. त्यानुसार आतापर्यंत ४२६ आस्थापनांनी अग्निशमन विभागाकडून अर्ज नेले आहेत. परंतु एनओसी प्रक्रिया पार पडत असतांना शहर विकास विभागाची देखील यात आता महत्वाची भुमिका असणार आहे.

Photocopy of Fire NOC for 426 establishments | कागदी घोड्यांमुळेच हॉटेल व्यावसायिकांना मिळणार मुदतवाढ, ४२६ आस्थापनांनी घेतले फायर एनओसीचे अर्ज

कागदी घोड्यांमुळेच हॉटेल व्यावसायिकांना मिळणार मुदतवाढ, ४२६ आस्थापनांनी घेतले फायर एनओसीचे अर्ज

Next
ठळक मुद्देपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे हॉटेल आस्थापनांना मिळणार वाढीव दिवसआॅन दि स्पॉट दिल्या जाणार फायर एनओसी

ठाणे : फायर एनओसीसाठी ठाणे महापालिकेने शहरातील ४५८ हॉटेल, पबला नोटिसा बजावल्यानंतर आतापर्यंत सुमारे ४२७ आस्थपनांनी मुदतवाढीनंतर अर्ज नेले असून त्यांना अत्यावश्यक कागदपत्रांची शनिवारपर्यंत पूर्तता करायची आहे. फायर एनओसी मिळाल्यानंतरचा चेंडून शहर विकास विभागाकडे जाणार असल्याने काही न्हीा करताच पालिकेच्याच कागदी घोडे नाचविण्याच्या धोरणामुळे या आस्थापनांना पुन्हा आणखी वाढीव दिवसांचा दिलासा मिळणार आहे. यामुळे त्यांचे सील आपसुक होणे लांबणीवर पडले आहे.
ठाणे शहरातील ज्या ५०० चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली हॉटेल, लाऊंज बार, हुक्का पार्लर्सनी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला सादर केलेला नाही. मुंबईतील आगीच्या घटनेनंतर शहरातील अशी हॉटेल पुन्हा चर्चेत आली होती. शहरातील ४५८ आस्थापनांनी फायर एनओसी घेतलीच नसल्याचे उघड झाल्यावर त्या सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. परंतु, या हॉटेल आस्थापनांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्तांची भेट घेऊन आणि १५ दिवसांची मुदतवाढ मागून घेतली. त्यानंतर पालिकेने अर्ज उपलब्ध करून दिले असून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवारपर्यंत ४२६ आस्थापनांनी अर्ज नेले असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.
दरम्यान आता पुढील पाच दिवसात या हॉटेल व्यावसायिकांनी अग्निशमन विभागाने विचारलेल्या १९ प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात देऊन त्याचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. ते सादर करतांनाच अग्निशमन विभागाने नेमलेली सहा जणांची टीम या सत्यप्रतिज्ञापत्राची जागेवर जाऊन पडताळणी करणार आहे. त्यानंतर आॅन दि स्पॉट हॉटेल व्यावसायिकांना अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला दिला जाणार आहे. मात्र, खरा कस शहर विकास विभागाचा लागणार आहे. अग्निशमन विभागाने तपासणी करून शिफारस आहे किंवा नाही याची शहनिशा करून त्या संदर्भातील स्पष्ट अहवाल हा सहाय्यक संचालक नगररचना यांना सादर करायचा आहे.
त्यानुसार शहर विकास विभाग या अहवालाच्या अनुषंगाने या आस्थापनांना शहर विकास विभागाच्या नियमानुसार म्हणजेच वैध स्ट्रक्चर स्टॅबिलिटी, अधिकृत इमारतीतील वापर परवाना (चेंज आॅफ युजर), एकत्रिकरण व अनधिकृत इमारतीमधील प्रशमन आकार (कम्पोडींग चार्जेस), आकारून नियमित केलेल्या अधिकृत आस्थापनांना पुढील परवाना देणार आहे.

  • शहर विकास विभागाने या संदर्भात ८ ते १२ जानेवारीपर्यंत कॅम्प आयोजित करून त्यानुसार या संदर्भातील बाबींची पूर्तता संबंधंत हॉटेल व्यवसायिकांकडून करून घ्यावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. परंतु,आज त्याला तीन दिवस उलटून गेले असतांनादेखील तशा प्रकारचा कॅम्प पालिकेकडून राबविण्यात आलेला नाही. पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे आपसुकच आता हॉटेल व्यावसायिकांना वाढीव मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


 

Web Title: Photocopy of Fire NOC for 426 establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.