शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका निवडणूक; पहिल्या दोन तासात अवघे ८ टक्केच मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:34 IST

ठाणे महापालिलेच्या ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळच्या सत्रात उत्साह दिसून आला. मात्र मतदान यंत्रांमधील घोळ, ईव्हीएम मशीन बंद पडणे, एरर येणे या त्रुटीमुळे पहिल्या दोन तासात अवघे आठ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली.ठाणे महापालिलेच्या ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र अगदी घोडबंदर पासून ते कोपरी पर्यंत वागळे, इंदिरानगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, बाळकुम, कोलशेत, नौपाडा आदींसह इतर भागात ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी मशीन यंत्रणा बंद पडली, काही ठिकाणी एरर येत होते, तर काही ठिकाणी मशीनला शॉक लागण्याचा प्रकारही समोर आला.त्यामुळे सकाळच्या सत्रात खाजगी कंपनीत कामाला असलेले नोकरदार मतदानासाठी गेले खरे मात्र त्यांना एक ते दोन तास ताटकळत रांगेत उभे राहावे लागल्याने काहींनी मतदान न करताच घरी जाण्याचा मार्ग पत्करला. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून आला. पहिल्या दोन तासात अवघ्या 8 टक्के मतदानाची नोंद झाली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Municipal Corporation Election: Only 8% voter turnout in first two hours.

Web Summary : Technical issues with EVMs marred Thane Municipal Corporation elections. Many voters faced delays due to malfunctioning machines, resulting in a low 8% turnout in the initial two hours.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६thaneठाणे