शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजेशाही थाट! ठाणे महापालिका आयुक्तांचा स्विमिंग पूल तब्बल 2 कोटींचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 09:53 IST

विजय सिंघल यांनी निर्णय घेतल्याचा विपीन शर्मा यांचा दावा

ठाणे : कोरोनामुळे ठाण्यातील टॉवरमधील स्विमिंग पूल बंद ठेवलेले असताना ठाणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करून स्विमिंग पूल बांधला आहे. सर्वसामान्य कोरोनामुळे टाचा घासून मरत असताना आयुक्तांकरिता हा राजेशाही थाट कशाला हवा, असा सवाल केला जात आहे. नूतनीकरणाकरिता केवळ ५० लाख रुपयांची निविदा मागवल्याचे भासवले गेले. प्रत्यक्षात हा खर्च ‘वाढता वाढता वाढे’ यानुसार दोन कोटींवर गेला. विद्यमान आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या खर्चाबाबत कानावर हात ठेवले असून, विजय सिंघल हे अल्पावधीकरिता आयुक्त असताना त्यांनी नूतनीकरणाचा हा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.महापलिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना आयुक्तांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. याबाबत आयुक्तांवर आणि महापालिकेच्या उधळपट्टीवर टीका झाली. मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी यावरून आयुक्तांवर टीकास्त्र सोडले. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची अलीकडेच पाचंगे यांनी भेट घेतली. त्यावेळी नूतनीकरणाचा निर्णय माझ्या कार्यकाळात झाला नसून, माझ्या आधीच्या आयुक्तांच्या म्हणजे विजय सिंघल यांच्या काळात झाला असून, त्याची माहिती लेखी स्वरूपात दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. मात्र, शर्मा यांना हा निर्णय स्थगित करता आला असता, असे ठाण्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दीर्घ रजेनंतर पदभार सोडल्याने, ऐन कोरोनाकाळात नवीन आयुक्त विजय सिंघल यांनी पदभार स्वीकारला. तेव्हा, पालिकेतील प्रशासकीय साखळीने पातली पाडा येथील आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणासाठी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तब्बल ५० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करून आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरण व दुरुस्तीचा घाट घातला होता. तेव्हाही या उधळपट्टीवरून वादंग उठले होते. मात्र, बंगल्याचे काम पूर्ण होण्याआधीच अवघ्या अडीच-तीन महिन्यांत सिंघल यांची बदली झाली. त्यानंतर जून २०२० अखेरीस ठामपा आयुक्तपदी डॉ. विपीन शर्मा विराजमान झाले. डॉ. शर्मा यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ठाण्यात कोरोनाचा कहर सुरू होता. त्यामुळे आयुक्तांच्या सुस्थितीत असलेल्या बंगल्याच्या नूतनीकरणाचा निर्णय जयस्वाल यांच्या कार्यकाळात झाला व सिंघल यांनी कार्यभार घेताच नूतनीकरणाची अंमलबजावणी सुरू केली का, असा सवाल उपस्थित होतो.सिंघल यांच्या चौकशीची मागणीकोरोनाचा प्रकोप सुरू असताना सिंघल यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता नूतनीकरणाचा प्रस्ताव रेटला असेल, तर सिंघल यांची राज्याच्या मुख्य सचिवांनी चौकशी केली पाहिजे, असे सर्वसामान्य ठाणेकरांचे मत आहे.एकीकडे कोरोना उपाययोजनांसाठी नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन व नगरसेवक निधी दिला असताना आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणाकरिता कोट्यवधींचा खर्च कशाला हवा, असा सवाल संदीप पाचंगे यांनी केला. आयुक्तपदावरील व्यक्ती त्यांच्या व्यस्त कामकाजातून वेळ मिळत नाही, असे सांगतात. मग आयुक्त पोहतात कधी, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका