लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र येथे कोविड १९ लसीकरणाचा यशस्वी ड्राय रन घेण्यात आला. यावेळी शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी डमी रु ग्ण म्हणून सहभाग घेतला.शहरातील कोविड महामारी आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने उत्तम काम केल्यामुळे कोविड रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्क्यांवर आले. लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाच्या नियमांचे पालन करीत संपूर्ण तयारी केली असून लसीकरणासाठी महापालिका सज्ज असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ड्रायरनच्या वेळी स्पष्ट केले.तसेच लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्याची माहिती कोविन या पोर्टलवर टाकण्याचे काम सुरू आहे. शनिवारपासून महाहापालिका कक्षातील १५ आरोग्य केंद्रावर ड्राय रन घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.यावेळी महापौरांसह उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती साधना जोशी, नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर आदींनी डमी रु ग्ण म्हणून महत्वाची भूमिका पार पाडून सर्वसामान्य नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत विश्वास निर्माण केला.* आयुक्तांना आणि महापौरांना लसीकरण चाचणीच्या वेळी आरोग्य कर्मचारी महिलेने ओळखपत्र विचारल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. परंतू, आयुक्तांनीही अगदी अदबीने ते दाखवून लसीकरण करुन घेतले. काही काळ त्यांच्या मोबाईलवर माहिती उपलब्ध झाली नव्हती. त्यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे त्याबाबत विचारपूस केली.* लसीकरणासाठी कशाची गरज:लसीकरणापूर्वी न्याहारी केली असावी. आधी आजार असल्यास त्याची फाईल आणावी. मानसिक तयारी. लस दिल्यानंतरही मास्क, सॅनिटायझर आणि योग्य सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच पहिला डोस दिल्यावर कोणताच त्रास झाला नाहीतर पुन्हा दुसºया डोससाठी २८ दिवसांनी येण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या. या संपूर्ण लसीकरण मोहीमेचे आयुक्तांनी कौतुक केले.* सोशल डिस्टसिंगचा मात्र फज्जाकोविडवरील ड्राय रन लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी अनेकांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडविल्याचे पहायला मिळाले. आरोग्य अधिकारी मात्र, हे नियम पाळण्याबाबत वारंवार सूचना करीत होते.
ठाणे पालिका आयुक्तांनी ओळखपत्र दाखवून केला कोरोना लसीकरणाच्या चाचणीचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 23:07 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र येथे कोविड १९ लसीकरणाचा ...
ठाणे पालिका आयुक्तांनी ओळखपत्र दाखवून केला कोरोना लसीकरणाच्या चाचणीचा प्रारंभ
ठळक मुद्दे कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर - महापौर म्हस्के लसीकरणाचा ड्राय रन