ठाणे महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांवर शेलक्या शब्दांत टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 02:00 AM2020-02-20T02:00:08+5:302020-02-20T02:00:27+5:30

चॅट व्हायरल : अधिकारी नेत्यांचे बटिक झाल्याचा केला आरोप

The Thane Municipal Commissioner criticizes the officers in a word | ठाणे महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांवर शेलक्या शब्दांत टीका

ठाणे महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांवर शेलक्या शब्दांत टीका

Next

ठाणे : अधिकाऱ्यांच्या बदल्या अवघ्या ४८ तासांत मागे घेण्याची नामुश्की ओढवल्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वरिष्ठ अधिकाºयांवर शेलक्या शब्दांत टीका केल्याने महापालिका वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. काही अधिकारी राजकीय नेत्यांचे बटीक असल्याचा आरोप जयस्वाल यांनी या संदेशात केल्याचे स्क्रिनशॉट बुधवारी व्हायरल झाले. पालिका अधिकाºयांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवलेल्या या संदेशांमध्ये आयुक्तांनी काही अधिकाºयांबाबत आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे दिसते. संबंधित अधिकाºयांनी त्यास दुजोरा दिल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला विश्वासात न घेता पालिकेतील चार उपायुक्तांसह पाच सहायक आयुक्तांच्या गेल्या शनिवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी हे आदेश काढले होते. या बदल्यांमध्ये वादग्रस्त उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवल्याने काही अधिकाºयांमध्ये नाराजी होती. त्यापैकी काहींनी ही बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानांवर घालताच त्यांनी तातडीने या बदल्या स्थगित करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यामुळे ४८ तासांत आयुक्तांना बदल्या रद्द कराव्या लागल्या. या प्रकाराने संतापलेल्या जयस्वाल यांनी अधिकाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर नाराजी व्यक्त करत काही अधिकाºयांना फैलावर घेतले. या संदेशांत जयस्वाल यांनी अधिकाºयांचे नाव न घेता अपशब्द वापरले, असे या अधिकाºयांचे म्हणणे आहे. आयुक्तांनी शेलक्या भाषेचा वापर केल्याने आपण आवाक् झालो असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. आयुक्तांनी वापरलेल्या अपशब्दांमुळे अधिकाºयांचे कुटुंबीयही व्यथित झाले असून, त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेण्याची तयारी सुरू केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, याबाबत जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.

झुकते माप दिल्याची चर्चा
वरिष्ठ अधिकाºयांच्या बºयाच वर्षांनंतर बदल्या केल्या होत्या. त्यात ठरावीक अधिकाºयांना झुकते माप दिल्याची चर्चा होती. शिक्षण विभागाचा कारभार पाहताना उपायुक्त मनीष जोशी यांच्यावर अनेकदा टीका झाली. तरीही, त्यांच्याकडे महत्त्वाचे विभाग सोपविण्यात आले.

Web Title: The Thane Municipal Commissioner criticizes the officers in a word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.