शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शंकर पाटाेळेंसह तिघांचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:21 IST

गुरुवारी याच संदर्भात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या अधिकाऱ्यांची चांगली हजेरी घेतली हाेती.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : बांधकाम व्यावसायिकाकडून ३५ लाखांची लाच स्वीकारणारे ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटाेळे यांच्यासह तिघांचेही जामीन अर्ज ठाण्याचे सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी फेटाळले. या गंभीर प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असल्याने आरोपींकडून पुराव्यांमध्ये काेणतीही छेडछाड हाेऊ नये, यासाठी जामीन फेटाळल्याचे न्यायालयाने म्हटले.

गुरुवारी याच संदर्भात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या अधिकाऱ्यांची चांगली हजेरी घेतली हाेती. तपासातील काही त्रुटींवरही बाेट ठेवले. निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास दिल्याबद्दल न्यायालयाने खेद व्यक्त केला. त्यामुळे  निरीक्षकांऐवजी अधीक्षकांनीच या सुनावणीला हजर हाेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी एसीबीचे ठाण्याचे अधीक्षक शिवराज पाटील हे स्वत: उपस्थित हाेते. 

...तर तपासात बाधा

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने अशा प्रकारे लाच घेणे हे समाजाला घातक आहे. आराेपीला जामीन दिल्याने तपासात बाधा येऊ शकते. तपास प्राथमिक पातळीवर असल्याचे सरकारी वकील संजय लाेंढे यांनी मांडली.दाेन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर पाटाेळे यांच्यासह तिन्ही आराेपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले. सुनावणीच्या वेळी न्यायालयात अनेक वकिलांनीही गर्दी केली हाेती.

English
हिंदी सारांश
Web Title : Shankar Patole and two others' bail rejected by Thane court.

Web Summary : Thane court rejected bail pleas of suspended Thane Municipal Corporation Deputy Commissioner Shankar Patole and two others in a bribery case. The court cited potential obstruction of the ongoing investigation as the reason.
टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका