शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

एकनाथ शिंदेंकडेच ठाण्याचे पैसे, नारायण राणेंची सरकारविरोधात बॅटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 22:05 IST

ठाण्यात केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी राणे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच टिकास्त्र सोडले.

ठळक मुद्देठाण्यात अनाधिकृत बांधकामे वाढत आहेत, परंतु त्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. अनाधिकृत बांधकामांना पाठीशी घातले जात आहे. चुक करणा:या अधिकाऱ्यावर कारवाई होणो अपेक्षित असतांना येथे त्या बांधकामांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवर इथे गुन्हे दाखल केले जातात.

ठाणे  : आम्ही राज्य सरकाराला निधी दिला आहे, राज्य सरकाराने आधी ठाण्याचे पैसे द्यावेत मग आमच्याकडे निधीची अपेक्षा करावी. परंतु ठाण्याचे पैसे हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच असल्याची टिका भाजपचे खासदार नारायण राणो यांनी केली आहे. त्यांच्याकडे युडीचे खाते आहे, त्यांनी पैसे दिले तर ठाण्याचा विकास होईल असाही टोला त्यांनी लगावला.      ठाण्यात केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी राणे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच टिकास्त्र सोडले. महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राणे यांना छेडले असता, त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवित त्यांच्याकडे युडीचे खाते आहेत, त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडेच असल्याचा टोला लगावला. ५०० चौरस फुटांच्या घरांना अद्याप करमाफी दिलेली नाही. आधी वचने देतात, आणि त्यांना पाने पुसन्याचे काम ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे खोटारडेपणाचे सत्ताधारी आहेत. परंतु वचने पूर्ण करण्याची धमकसुध्दा लागते ती ठाण्यातील शिवसेनेत नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली. 

ठाण्यात अनाधिकृत बांधकामे वाढत आहेत, परंतु त्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. अनाधिकृत बांधकामांना पाठीशी घातले जात आहे. चुक करणा:या अधिकाऱ्यावर कारवाई होणो अपेक्षित असतांना येथे त्या बांधकामांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवर इथे गुन्हे दाखल केले जातात. याचाच अर्थ ठाण्यात पालिका अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेची मिलजुली सरकार आहे. पालिकेचे अधिकारी येथे तक्रारदाराला धमक्या देतात मात्र अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणो महापालिकेत भ्रष्टाचार वाढलेला आहे, त्यामुळे ठाण्याची जनता बेजार झालेली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या या भ्रष्टाचाराचा बुरखा आम्ही फाडणार असून आगामी ठाणो महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत येईल असा दावाही त्यांनी यावेळी केला. सत्ताधारी कमकुवत आहेत, त्यामुळेच अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, किंबहुना चुकीच्या कामात याच अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याने अधिकारी देखील फोफावले असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :thaneठाणेNarayan Raneनारायण राणे Eknath Shindeएकनाथ शिंदे