शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना राष्ट्रीय सैनिक संस्थेमार्फत मानद ’कमांडर’ पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 15:38 IST

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना मानद ’कमांडर’ पदवी देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देसंजय केळकर यांना मानद ’कमांडर’ पदवीइतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचाही गौरव सुरु असलेले देशकार्य अखंडित सुरु ठेवीन - आ. केळकर

ठाणे: ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानद ‘कमांडर’ हि पदवी प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट जनरल समन्वार व पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते मान - अभिमानाचा लष्करी वेष देऊन त्यांना गौरविण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान व राष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड येथे झालेल्या १९७१ भारत - पाक युद्धाच्या विजय दिन स्मृती समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला.          इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनाही याच सन्मानाने यावेळी गौरविण्यात आले. ‘सैनिक शाळेत शिक्षण घेतले पण लष्करात दाखल होऊन देशसेवा करता आली नाही. राष्ट्रीय सैनिक संस्थेने मला कमांडर या पदवीने सन्मानित केल्याने माझी इच्छा पूर्ण झाली. या गणवेशाचा आणि सन्मानाचा मान राखून सुरु असलेले देशकार्य अखंडित सुरु ठेवीन अशा शब्दांत आ. केळकर यांनी बोलताना कृतज्ञता व्यक्त केली. ते सन्मान सोहळ््यात बोलत होते.           १९७१ भारत - पाक युद्धात विशेष पराक्र म करणारे जवान, अधिकारी व त्यांच्या वीरपत्नी अशा एकूण २० जणांचा या समारंभात सन्मान करण्यात आला. पोलीस दलात उल्लेखनीय कामिगरी करणाºया अधिकाºयांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि अमर जवानांच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र समर्पण, राष्ट्रभक्तीपर गीते आदी कार्यक्रमांमुळे या समारंभाला विशेष गांभीर्य प्राप्त झाले. दरवर्षी १६ डिसेंबर हा ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी प्रथमच वरील तिघांचा मानद ‘कमांडर’ पदवीने बहुमान करण्यात आला व त्यांना सन्मान कमांडरचा युनिफॉर्म प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्र माचे सूत्रसंचालन सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcommandoकमांडोMLAआमदार