ठाणे शहरात सोमवारी पातलीपाडा उड्डाणपुलावर फाउंटन रोडकडे जाणाऱ्या एका कंटेनरला आग लागल्याने परिसरात खळबळ माजली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी किंवा दुखापत झाली नाही. या घटनेबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली असून पातलीपाडा उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील उड्डाणपुलावर आज दुपारी एका कंटेनरला आग लागली. त्यानंतर स्थानिकांनी ताबडतोब अग्निशमन दलाला या आगीची माहिती दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. या आगीत आतापर्यंत जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. परंतु, या घटनेमुळे उड्डाणपुलावर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहतूक जवळजवळ ठप्प झाली आहे.