शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अवतरला खली; पठाणी पोशाखाने संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 00:28 IST

लोकलमधून प्रवास करताना संशयावरून काबूलच्या मोहम्मद शेर खान याला लोहमार्ग पोलिसांनी ठाण्यात ताब्यात घेतले.

पंकज रोडेकर ठाणे : लोकलमधून प्रवास करताना संशयावरून काबूलच्या मोहम्मद शेर खान याला लोहमार्ग पोलिसांनी ठाण्यात ताब्यात घेतले. तो ज्या डब्यात बसला होता, त्या डब्याची श्वान पथकाद्वारे कसून तपासणी केली. पण, कोणताही अनुचित प्रकार नसल्याचे समोर आल्यावर लोकल पाच मिनिटांत टिटवाळ्याला रवाना झाली. भारदस्त देह आणि ८.२ इंच उंची असलेल्या या पठाणला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्याला पाहून जणू ठाण्यात खली अवतरला की काय, अशा चर्चा सुरू होती. दरम्यान, त्याची रात्री उशिरापर्यंत दहशतवादविरोधी पथकाद्वारे चौकशी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.रविवारी सकाळी साधारणत: ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाचा फोन खणखणला. पलीकडून आवाज आला, साहेब मुंबई पोलीस दलातून पोलीस अंकु श राठोड बोलतोय. मी सीएसएमटी-टिटवाळा लोकलने प्रवास करत असून त्यामध्ये भारदस्त देहबोली आणि पठाणी पोशाख धारण केलेली व्यक्ती आहे. तो संशयास्पद वाटत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, स्थानक उपप्रबंधक र.वि. नांदुस्कर यांनी प्रबंधक आर.के. मीना यांच्यासह रेल्वे कंट्रोल, ठाणे सुरक्षा पोलीस बल तसेच लोहमार्ग पोलिसांसह श्वान पथकाला तातडीने ही माहिती दिली. जेव्हा कॉल आला, तेव्हा ती लोकल विक्रोळी येथून ठाण्याकडे निघाली होती. लोकल येईपर्यंत आरपीएफ, जीआरपी आणि श्वान पथकाचे जवान ठाण्यातील फलाट क्रमांक-२ येथे दाखलही झाले होते. लोकल साधारणत: ११.२० वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक-२ वर लागली. पोलिसांनी लगेच ५२७६ बी या डब्याचा ताबा घेतला. या डब्यातील प्रवाशांना बाहेर येण्याचे आवाहन करून लगेचच डबा खाली केला. मोहम्मद शेर खान याला डब्यातून उतरवत ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आणले. त्यानंतर, श्वान पथकाद्वारे डब्याची कसून तपासणी करण्यात आली. श्वान पथकास पाहून नागरिकांनी एकच गर्दी केली. डब्यातून खलीसारख्या दिसणाऱ्या शेर खानला पाहून प्रबंधक कार्यालयाला गराडा पडला होता. त्याला ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी सुरुवातीला चौकशी केली. तोपर्यंत दहशतवादविरोधी पथकही ठाण्यात दाखल झाले.>दहशतवाद विरोधी पथकाने काबुली पठाणची चौकशी सुरू झाली. यावेळी त्याच्याकडे पासपोर्ट मिळाला. आपण २१ फेब्रुवारी रोजी अफगाणमधून निघाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दिल्ली, नागपूर, मुंबई असा प्रवास करत असून डायफ्रूटचा व्यापारी असल्याचेही त्याने सांगितले. त्याची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. मात्र, पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही.