शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 21:35 IST

मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते.

ठाणे, दि. 29 - मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. तास-न्-तास अडकून राहण्यापेक्षा काहींनी रेल्वे मार्गावरुनच घर आणि कामावर जाणे पसंत केले. दुपारी १ वाजेपर्यंत काहीशा धीम्या गतीने सुरु असलेली रेल्वे सेवा दुपारी १.३० वाजेनंतर पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे ठाण्यातून मुंबईकडे जाणारी (अप) आणि कल्याण तसेच कर्जत कसा-याकडे जाणारी वाहतुकीवरही तिचा परिणाम झाला. दुपारपासून सायंकाळपर्यंत अनेक प्रवासी हे ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा, कोपर, डोंबिवली, ठाकूर्ली तसेच कल्याण येथील रेल्वे स्थानकांवर अडकले होते. त्यामुळे या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. कल्याण डोंबिवलीतून ठाण्याकडे येण्यासाठी दुपारी बसलेले प्रवासी मुंब्रा आणि कळवा येथून रेल्वे मार्गातून कसेबसे ठाण्यापर्यत पोहचले. परंतु, त्यांना रिक्षा तसेच खासगी कार सेवेच्या लुटमारीचाही फटका बसला. मात्र, जे प्रवासी रेल्वेत अडकले होते, त्यांना रात्री उशिरापर्यंत गाडया सुरु न झाल्यामुळे त्यांचे चांगलेच हाल झाले. यात विशेषत: लहान मुले, महिला आणि वृद्धांना त्याचा चांगलाच फटका बसला.* रेल्वे मार्ग पाण्याखाली...कळवा, दिवा तसेच मुंब्रा येथील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला होता. तर कळवा रेल्वे स्थानकातील फलाटांच्या समप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

मुसळधार पावसामुळे ठाणेकर अंधारात, महावितरणनं केला वीजपुरवठा खंडीत

मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणनं वीजपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिसरातील जागरूक नागरिकही त्यांच्या स्थानिक परिसराची माहिती देत आहेत. तेथेही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. पावसाचे पाणी ओसरताच सुरक्षेचा आढवा घेऊन वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. या परिस्थित नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी केले आहे.महावितरणचे अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून ते फिल्डवर कार्यरत आहेत. ग्राहकांनी परिस्थितीनुसार तसंच गरजेनुसार आपल्या नजिकच्या कार्यालयाशी / संबंधित अधिका-यांशी  अथवा १८००-२३३-३४३५ किंवा  १८००-२००-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

१)    ठाणे १ विभाग -    गडकरी उपविभाग - ३ फिडर बंद – सुमारे १५ हजार ग्राहक प्रभावित-    कोपरी उपविभाग – १ फिडर बंद -  सुमारे १५ हजार ग्राहक प्रभावित -    किसान नगर उपविभाग – डी.टी.सी. बंद – सुमारे ३ हजार ग्राहक प्रभावित २)    वागळे विभाग – २५ फिडर  – सुमारे १,२५ ,००० हजार ग्राहक प्रभावित ३)    ठाणे २ विभाग -    कळवा उपविभाग – ४ फिडर बंद – सुमारे ४५ हजार ग्राहक -    विकास उपविभाग – ४ फिडर – सुमारे १० हजार ग्राहक -    पावरहाउस – माहिती लवकरच उपलब्ध होईल ४)    ठाणे ३ विभाग  - सुमारे ११०००० हजार ग्राहक५)    भांडुप विभाग – १ सब स्टेशन व ४ फिडर - सुमारे १६००० हजार ग्राहक६)    मुलुंड विभाग – ५ सब स्टेशन - सुमारे ७६००० हजार ग्राहक ७)    वाशी विभाग -    एरोली उपविभाग - ४ फिडर – २० हजार ग्राहक -    कोपर खैरणे उपविभाग – १ ट्रान्सफॉर्मर – १ हजार ग्राहक -    वाशी उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक ८)    नेरूळ विभाग – प्रभावित नाही ९)    पनवेल विभाग -    पनवेल १ (भिंगरी) उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक -    उरण उपविभाग – १ उपविभाग – १००० ग्राहक

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार