शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र सुरू करण्यात ठाणे उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:03 AM

दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना कार्यक्षेत्रातील रुग्णालयात केंद्र सुरू करण्याबाबत एक शासन निर्णय जारी करून दिव्यांगांना दिलासा दिला होता.

- पंकज रोडेकर ठाणे : दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना कार्यक्षेत्रातील रुग्णालयात केंद्र सुरू करण्याबाबत एक शासन निर्णय जारी करून दिव्यांगांना दिलासा दिला होता. मात्र, निर्णयाची वर्षपूर्ती झाली, तरी अद्यापही या दोन्ही महापालिकांनी ते सुरू केलेले नाही. त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.जिल्हा सामान्य रु ग्णालय आणि उल्हासनगर मध्यवर्ती रु ग्णालय या दोन रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र दिले जात आहे. या रु ग्णालयात आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी साधारणत: १५० दिव्यांग व्यक्तींना त्याचे वाटप होते. मात्र, बऱ्याच वेळा वीजपुरवठा खंडित होणे, नेटची समस्या उद्भवणे आदी समस्यांमुळे ते देण्यात काही वेळा विलंबही होतो. यावर उपाय म्हणून शासनाने १७ आॅक्टोबर २०१७ रोजी शासन निर्णयाद्वारे ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, तर लोकमान्य रु ग्णालय ओरस आणि नवी मुंबई महापालिकेच्या जनरल हॉस्पिटल यांना त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान करण्याचे अधिकार दिले आहेत. याचदरम्यान दोन्ही महापालिकांच्या डॉक्टर आणि कर्मचाºयांनी तत्कालीन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांच्या कालावधीत हे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. शासन निर्णय काढून एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्याप या रु ग्णालयांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान करण्याची प्रक्रि या सुरू झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रु ग्णालयांसह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयावर याचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून येणाºया दिव्यांगांना नाहक त्रास तर होताच, त्याचबरोबर वेळ आणि पैसाही खर्च होत असे.दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबत त्या महापालिकांना जिल्हा रुग्णालयात तसेच नुकतेच नाशिक येथे नव्या यूडीआयडी प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशिक्षण घेतले आहे. त्या दोन्ही महापालिकांमध्ये हे केंद्र सुरू झाल्यावर दिव्यांग व्यक्तींना होणारा त्रास कमी होईल.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालयमहापालिकेच्या कळवा आणि लोकमान्यनगर येथील रुग्णालयात लवकरच हे केंद्र सुरू होईल. यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लागत असल्याने त्याबाबत बैठक बोलावली आहे. तसेच, केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया दोन्ही रुग्णालयांत शेवटच्याटप्प्यात आहे.- डॉ. आर.टी. केंद्रे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिकायाबाबत पूर्ण तयार झाली आहे. तसेच संगणकीय प्रणालीद्वारे दिले जाणाºया प्रमाणपत्रांसाठी लागणाºया सॉफ्टवेअरचा पासवर्ड आणि युझर आयडी याबाबत शासनाकडे माहिती मागवली आहे. ती मिळाल्यानंतर तातडीने हे केंद्र सुरू करण्यात येईल. - दयानंद कटके, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका