शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Thane: इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली रेयांश खामकरच्या पराक्रमाची दखल

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 6, 2025 15:03 IST

Reyansh Khamkar: विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे १५ किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे, याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - ठाण्यातील स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनचा ६ वर्षीय जलतरणपटू रेयांश सानिका दिपक खामकर याने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे १५ किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले आहे. १५ कि.मीचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे, याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲड. निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष श्री राजेश मोरे यांनी देखील रेयांशचे अभिनंदन करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे दररोज सराव करीत आहे. रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचे शाळेनेही कौतुक केले आहे. गेल्या वर्षभरात  विविध स्पर्धामध्ये रेयांशने १३ पदके प्राप्त केली असून यात ५ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती. या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती. परंतु हे अंतर अवघ्या तीन तासात पार करुन रेयांशने एक विक्रम केला. त्याने केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून रेयांशला देवून त्याचा सन्मान केला आहे.

सन २०२४ मध्ये रेयांश खामकर हा सतत  विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेत होता.  २ जून २०२४ रोजी ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २५ मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत त्याने सुवर्णपदक तर ५० मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये कांस्य पदक प्राप्त केले. - ६ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्याने ५० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. - १७ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी बँकॉक, थायलंड येथे झालेल्या आशियाई ओपन स्कूल्स स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रेयांशने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो महाराष्ट्र एक्वाटिक असोसिएशनने निवडलेल्या 15 जलतरणपटूंपैकी एक होता ज्याने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.- ६ वर्षांखालील मुलांच्या गटात २५ मीटर फ्रीस्टाइल किकबोर्डमध्ये रौप्य पदक, २५ मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदक, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदक, २०० मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये रौप्य पदक त्याने प्राप्त केले.- १५ सप्टेंबर २०२४ रोजी अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारा आयोजित केलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धेत रेयांशने ५० मीटर मोनोफिन सरफेस स्विमिंगमध्ये सुवर्णपदक, १०० मीटर बायफिन मिश्र रिलेमध्ये सुवर्णपदक, ५० मीटर बायफिन स्विमिंगमध्ये रौप्यपदक पटकाविले. सदरची स्पर्धा ही ८ वर्षे व त्यावरील वयोगटासाठी होती, परंतु रेयांशने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत केलेली कामगिरी लक्षात घेवून ९ वर्षे या वरिष्ठ वयोगटात सहभागी होण्यासाठी त्याला विशेष प्रवेश देण्यात आला होता,  ज्यामध्ये त्याने ९ वर्षांखालील जलतरणपटूंशी स्पर्धा केली.- ९ ऑक्टोबर २०२४ रोजी विबग्योर हायस्कूल खारघर येथे झालेल्या १६व्या व्हिवा इंटरस्कूल जलतरण स्पर्धेत रेयांशने २० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक आणि २० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेSwimmingपोहणे