शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाणे जिल्ह्याला आनंदाची बातमी; बारवी धरण १०० टक्के भरले

By पंकज पाटील | Updated: August 11, 2022 19:40 IST

Baravi Dam: संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे.

- पंकज पाटीलबदलापूर - संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे. 11 पैकी धरणाचे आठ स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण शंभर टक्के भरले असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान धरणाच्या अकरा दरवाजे पैकी आठ दरवाजे उघडले गेले आहेत. हे सर्व दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे धरणात पाण्याचा साठा वाढल्यास या धरणाचे सर्वच्या सर्व अकरा दरवाजे उघडले जाणार आहेत. धरण भरल्याने आता धरणात 334 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

यंदा धरण क्षेत्रात एकूण एक हजार 752 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 11 ऑगस्ट रोजी धरण अवघे 82 टक्के भरले होते. गेल्यावर्षी हे धरण सहा सप्टेंबर रोजी १०० टक्के भरले होते. मात्र यंदा 11 ऑगस्टलाच धरण भरल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरील पाणी संकट संपुष्टात आले आहे. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण एमआयडीसी क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांना देखील पाणी पुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे बारावी नदीकिनारी असलेल्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उल्हास नदीच्या पात्रात देखील वाढ झाल्याने आता बारवी धरणातील पाणी देखील थेट उल्हास नदीत जाणार असल्याने उल्हास नदीच्या किनारी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अवघ्या दहा तासात दोन टक्के पाणीसाठा वाढलागुरुवारी सकाळी धरणाच्या पाण्याची पातळी तपासली असता सकाळी धरण 98 टक्के भरले होते. सायंकाळी पाच वाजता हे धरण भरून वाहू लागल्याने अवघ्या दहा तासात धरणातील दोन टक्के पाणीसाठा वाढला आहे. बारवी धरणाला जोडल्या लहान-मोठे ओढे भरून वाहत असल्याने हे धरण यंदा लवकर भरले आहे.  

टॅग्स :DamधरणWaterपाणीthaneठाणे