शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

आज २८ हजार बाप्पांना निरोप, विसर्जनावर ड्रोनची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 03:14 IST

मागील १० दिवसांपासून घरोघरी विराजमान होऊन पाहुणचार घेणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ समीप आली आहे.

ठाणे : मागील १० दिवसांपासून घरोघरी विराजमान होऊन पाहुणचार घेणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ समीप आली आहे. त्यानुसार, पोलीस असो वा महापालिका, या दोन्ही प्रशासनांनी कंबर कसून जोरदार तयारी केली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात जवळपास २८ हजार बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच पोलिसांकडून विसर्जनावर ड्रोन कॅमेºयांची नजर राहणार आहे. तसेच रोडरोमिओंना ‘आॅन दी स्पॉट’ पकडण्यासाठी साध्या वेशातील कर्मचाºयांसह साडेपाच हजार पोलीस तैनात केले आहेत. वाहतूक पोलिसांनी काही भागांतील मार्गात बदल केला आहे.ठाणे, डोंबिवली-कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, वागळे इस्टेट या पाच परिमंडळांत ६९९ सार्वजनिक, तर २७ हजार ९७ घरगुती पाहुणचार घेणाºया बाप्पांचा निरोप घेतला जाणार आहे.यासाठी पोलीस आयुक्तालय परिसरात नऊ पोलीस उपायुक्त, १७ सहायक पोलीस आयुक्त, ११० पोलीस निरीक्षक, २५७ सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ३३६७ पोलीस (पुरुष-महिला) कर्मचारी, ७०० कॉन्स्टेबल असा एकूण चार हजार ४६० पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला आहे. तसेच त्यांच्यासोबतीला ४९१ होमगार्ड असणार असून रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची एक कंपनी, पाच राज्य राखीव दलाच्या तुकड्या असणार आहेत. तर, विसर्जन घाटाकडे जाणाºया काही मार्गांवर बदल करण्यात आले आहे. तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ५४ पोलीस अधिकारी, ५५० कर्मचाºयांसह २५० वॉर्डन आणि ७३ होमगार्ड तैनात केले आहेत.गणपती विसर्जनासाठी विसर्जन घाट सज्जठाणे : दहा दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी ठाण्यातील कृत्रिम तलावांबरोबर विसर्जन घाटही सज्ज झाले आहेत. विविध सोयीसुविधांबरोबरच या विसर्जन घाटांवरील स्वच्छतेवर पालिकेने भर दिला आहे. तसेच, विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचप्रमाणे काही विसर्जन घाटांवर नवीन डोझरही मागवण्यात आले आहेत.ठाणे महापालिकेची यंत्रणा यावर्षीही पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी सज्ज झाली असून विसर्जनासाठी महापालिकेने पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली आहे. श्री गणेशमूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे, या दृष्टिकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे तयार केलेले विसर्जन महाघाट सज्ज झाले आहेत. या ठिकाणी छोट्या गणेशमूर्तींबरोबरच पाच फूट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्यकलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा, यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेशभक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युतव्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज झाली आहे. काही ठिकाणी आरतीसाठी मंडप उभारले आहेत. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. ‘प्लास्टिकचा वापर टाळा, नियमांचे पालन करा, ध्वनिप्रदूषण टाळा’ असे संदेश विसर्जन घाटांवर देण्यात आले आहेत. काही मंडळांनी महाप्रसाद आणि पाणीवाटपाचीही सोय केली आहे. छोट्या मूर्तींसाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच, आदल्या दिवशीपासून याठिकाणी स्वच्छतेसाठी साफसफाई केली जात आहे.रुग्णवाहिका सेवाआपण सारे या संस्थेच्यावतीने स्व. बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या स्मरणार्थ रविवारी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान, मासुंदा तलाव चौक, काँग्रेस कार्यालयाजवळ गणेशभक्तांसाठी मोफत वडापाव, पाणी यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच मोफत रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध क रण्यात येणार आहे.अनंत चतुर्दशीच्या विसर्जनावर पोलिसांनी विशेष खबरदारी घेऊन करडी नजर ठेवली आहे. चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून यंदा प्रथमच ड्रोनचा वापर केला जाणार आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. काही संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या, तर १०० नंबर किंवा तैनात असलेल्या पोलिसांना त्याबाबत सांगावे, असे आवाहन केले.- दीपक देवराज, उपायुक्त, ठाणे गुन्हे शाखाश्री गणेशाचे विसर्जन मंगलमय वातावरणात होण्याच्या दृष्टीने महापालिकेने विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सातत्याने याठिकाणी स्वच्छता ठेवली जात आहे. - संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिकाठाणे महापालिकेने विशेष स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षारक्षक, अग्निशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८newsबातम्या