शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: महेश आहेर मारहाण प्रकरणी चौघांना अटक, काल संध्याकाळी झाली होती मारहाण

By जितेंद्र कालेकर | Updated: February 16, 2023 14:58 IST

Thane: महापालिका अधिकारी महेश आहेर मारहाण प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता.

ठाणे - महापालिका अधिकारी महेश आहेर मारहाण प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हेमंत वाणी, अभिजित पवार, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघाना गुरुवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली.  ठाणे न्यायालयाने  त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी गंभीर कलमांखाली बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. आहेर यांच्यावर अभिजित पवार,विक्रम खामकर आणि हेमंत वाणी आदींनी ठाणे महापालिकेच्या आवारात बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ते ठाणे महापालिका गेट क्रमांक चार येथे मोबाईलवर बोलत असतांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता.

आपल्या तक्रारीमध्ये आहेर यांनी म्हटले होते की, त्यांनी विक्रम खामकर यांच्याविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हयाचा आणि आणि आव्हाड यांच्या मतदारसंघात बेकायदा बांधकाम तोडल्याचा तसेच त्यांचे न ऐकल्याचा राग मनात धरुन अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि इतर तिघांनी त्यांच्याजवळ येत आव्हाड यांनी तुला संपवायला सांगितल्याचे सांगत बंदूक आणि चॉपरने वार करण्याच्या उद्देशाने आहेर यांना मारहाण केली. त्यांचे अंगरक्षक आल्यानंतर मात्र तिथून पळ काढला. जातांना तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. या घटनेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालतया उपचारासाठी दाखल केलेल्या आहेर यांनी नौापाडा पोलिसांकडे ही तक्रार दिली होती. 

 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका