शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : ड्रायव्हिंग लायसन्स, रिक्षा परमिटचे बनावट कागदपत्र तयार करणा-या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 03:36 IST

वाहन चालवण्याचा परवाना आणि आॅटोरिक्षाच्या परमिटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला.

ठाणे : वाहन चालवण्याचा परवाना आणि आॅटोरिक्षाच्या परमिटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रांचा मोठा साठा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाºया टोळीची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती. त्यानुसार, १८ जानेवारी रोजी भिवंडी येथील धामणकरनाका येथील केजीएन संजरी आॅटो कन्सल्टंटवर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी भिवंडी येथील गैबीनगरातील नफीज सगीर अहमद फारुकी (३८) आणि हापसन आळीतील नाजील नवाज अहमद मोमीन (२८) यांना अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, बनावट रहिवासी दाखला, रिक्षा परमिट आणि मोटार वाहन विम्याची कागदपत्रे तसेच लॅपटॉप, संगणक आदी साहित्यही जप्त करण्यात आले. भिवंडीतील रहिवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना परमिट मिळवून देण्याचा धंदा आरोपी ४-५ वर्षे करत आहेत.चौकशीतून पोलिसांनी निजामपुरा येथील मोहमद इस्माईल मोहम्मद रजा अन्सारी उर्फ पप्पू (३४) आणि शेलारगाव येथील संगमेश्वर मरोळसिद्ध स्वामी (४२) यांना अटक केली. मोहमदच्या दुकानात तसेच संगमेश्वरच्या घरी छापा टाकून शाळा सोडल्याचे बनावट दाखले, डॉक्टरचा बनावट शिक्का, आरटीओ अधिकाºयाचा शिक्का, बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनीचा शिक्का आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जैसा काम, वैसा दाम...-आरोपींचे आरटीओ अधिकाºयांशी साटेलोटे आहे का, याचा तपास सुरू आहे. आरटीओच्या कोणत्याही कामासाठी सर्व प्रकारची बोगस कागदपत्रे आरोपी पुरवायचे. जेवढी बोगस कागदपत्रे लागतील, तेवढे जास्त पैसे ते लोकांकडून घ्यायचे. एका कामासाठी ६ हजार रुपयांपासून ३०हजार रुपयांपर्यंत ते लोकांकडून घ्यायचे, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली. आरोपींना न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस