शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडीची शिकार करणा-यास ठाणे वनविभागाने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 22:11 IST

घोरपडीची कत्तल होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची गंभीर दखल घेत ठाणे वनविभागाने सुभाष राठोड (३२, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई) याला ३० आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याला २ नोव्हेंबरपर्यंत वन विभागाची कोठडी मिळाली आहे.

ठळक मुद्देबेलापूर भागातून घेतले ताब्यातदगड मारून केली शिकार२ नोव्हेंबरपर्यंत वनविभागाची कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोरपडीची शिकार करून कत्तल करणा-या सुभाष देवजी राठोड (३२, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई) याला ठाणे वनविभागाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बेलापूर येथील सेक्टर आठ दुर्गामातानगर येथे घोरपड या वन्य प्राण्याची चाकूने कत्तल होत असल्याची माहिती ठाणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल मुठे यांना मिळाली होती. तसा व्हिडिओदेखील या त्यांना मिळाला. याच माहितीच्या आधारे ३० आॅक्टोबर रोजी ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक सनसंरक्षक गिरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेद्र मुठे, ठाणे वन्यजीव विभागाचे वनपाल मनोज परदेशी, वनरक्षक अर्जुन निचिते आणि सचिन सुर्वे आदींच्या पथकाने मिळालेल्या व्हिडीओची खात्री करून पुनर्वसू फाउंडेशनचे सदस्यांच्या मदतीने या मृत घोरपडीचा शोध घेतला. तेंव्हा सीबीडीतील सेक्टर आठ मधून राठोड याला या पथकाने ताब्यात घेतले. ही घोरपड घराजवळील जंगलात आढळल्यानंतर अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तिला दगड मारला. नंतर चाकू आणि ब्लेडने तिचे मटण खाण्यासाठी कत्तल केल्याची कबुली त्याने वनविभागाच्या या पथकाला दिली. त्याच्याविरुद्ध वन्यप्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. न्यायालयाने राठोड याला २ नोव्हेंबरपर्यंत वनविभागाची कोठडी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेforestजंगलCrime Newsगुन्हेगारी