- कुमार बडदेमुंब्रा - रस्त्याने चाललेल्या दुचाकी चालकाला दगड मारुन त्याच्या दुचाकीच्या डिकी मधील रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेलेल्या अनोळखी चोरा विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील कौसा परीसरात रहात असलेले शाह आलम खान रविवारी रात्री मुंब्रा बायपास रस्त्यावरून दुचाकी वरुन चालले होते.ते सध्या बंद असलेल्या टोलनाक्या जवळून मार्गक्रम करत होते.त्यावेळी अनोळखी व्यक्तीने त्याच्या डोक्यावर दगड मारला.यामुळे त्यानी दुचाकी थांबवली असता चोराने त्याच्या दुचाकीच्या डिकी मधील रोख १ लाखा २३ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन पोबारा केला.याबाबत रात्री उशिरा त्यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरुन अनोळखी चोरा विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष उगलमुगले करत आहेत.
Thane: दुचाकी चालकाला दगड मारून जबरी चोरी, रोख रक्कम लांबवली
By कुमार बडदे | Updated: March 6, 2023 16:35 IST