शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ठाणे : आधी जनजागृती करा मगच कचरा उचलणे बंद करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:39 IST

ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालयांसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार चौ. मीटरच्या क्षेत्रात वसल्या असतील त्यांनी त्यांच्या कच-याचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी कच-याची विल्हेवाट लावावी, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बजावण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे : ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालयांसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार चौ. मीटरच्या क्षेत्रात वसल्या असतील त्यांनी त्यांच्या कच-याचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी कच-याची विल्हेवाट लावावी, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बजावण्यास सुरुवात केली आहे. तसेच जे कच-याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांचा कचरा उललला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानुसार पालिकेच्या डेडलाईननंतर काही सोसायट्यांचा कचरा उचलणे बंद केल्याचा मुद्दा बुधवारच्या महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. आधी सोसायट्यांना कचºयाची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण द्यावे त्यानंतरच कचरा उचलणे बंद करावे अशी मागणीही सदस्यांनी केली. त्यानुसार महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आधी जनजागृती, प्रशिक्षण द्या मगच कचरा उचलणे बंद करा, तोपर्यंत कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरूच ठेवावी असे आदेश संबंधितांना दिले.महासभेत भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी या मुद्याला हात घालून पालिकेने पाठविलेली नोटिस सभागृहाला सादर केली. परंतु, काही सोसायट्या छोट्या असल्याने त्यांना कचºयाची विल्हेवाट लावता येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नोटिस बजावण्यापूर्वी कचºयाची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण, जनजागृती करणे अपेक्षित होते, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्याच अनुषंगाने इतर सदस्यांनीदेखील स्वच्छ शहर म्हणून पालिका दावा करीत असली तरी केंद्राने केलेल्या सर्व्हेत आपण १७ वरुन ११६ क्रमांकावर कसे गेलो असा सवाल नारायण पवार यांनी केला. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून दिला जात असला तरी तो घंटागाडीत एकत्रीतच टाकला जात असल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी निदर्शनास आणले. महापालिकेला अद्यापही स्वत:चे हक्काचे डंपींग ग्राउंड मिळविता आलेले नाही, असे असतांना ठाणेकरांवर ही कुºहाड कशासाठी असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला.दरम्यान, आपला प्रभाग स्वच्छ राखणाºया टॉप टेन नगरसेवकांना प्रत्येकी अतिरिक्त २५ लाखांचा निधी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. परंतु, ज्या भागात सोसायटी आहेत, त्यांनाच ते मिळणार आहेत, आमच्या सारख्या झोपडपट्टी भागाला या टॉप टेनमध्ये संधी असणार का? असा प्रश्न राष्टÑवादीच्या हणमंत जगदाळे यांनी केला. एकूणच आधी जनजागृती, प्रशिक्षण, कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कशा प्रकारच्या यंत्रणा आहेत, याची माहिती प्रदर्शन भरविण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. प्रशासनाने कोणत्याही सोसायटीचा कचरा उचलणे बंद केले नसल्याचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील महिन्यात या संदर्भातील प्रदर्शन लावण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका