शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाण्यात टोइंग व्हॅनवरील कर्मचा-याची तरूणीला मारहाण, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:17 IST

ठाणे : टोइंग पथकातील खासगी कर्मचा-यांनी एका संगीत शिक्षिकेची छेड काढून, तिला जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ठाण्यात घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली.ठाण्यातील वसंतविहारमध्ये राहणारी २१ वर्षीय युवती हायपरसिटी मॉलमध्ये संगीत शिक्षिका आहे. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तिने शेअर रिक्षा घेतली. रिक्षामध्ये एक पुरुष आणि एक ...

ठाणे : टोइंग पथकातील खासगी कर्मचा-यांनी एका संगीत शिक्षिकेची छेड काढून, तिला जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ठाण्यात घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली.ठाण्यातील वसंतविहारमध्ये राहणारी २१ वर्षीय युवती हायपरसिटी मॉलमध्ये संगीत शिक्षिका आहे. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तिने शेअर रिक्षा घेतली. रिक्षामध्ये एक पुरुष आणि एक अन्य महिला प्रवासी होती. घोडबंदर रोडने रिक्षा जाताना, बाजूनेच वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅनही जात होती. व्हॅनच्या चालकाने रिक्षात बसलेल्या पीडित युवतीकडे बघून इशारे करायला सुरुवात केली. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. ब्रह्मांड सिग्नलजवळ आॅटोरिक्षा थांबली, तेव्हा व्हॅनच्या मागे उभ्या असलेल्या टोइंग पथकातील आणखी एका युवकाने युवतीला बघून अश्लील हातवारे केले. आॅटोचालकाने त्यांना हटकले असता, त्यांनी चालकास दमदाटी केली. सिग्नल मोकळा झाल्यानंतर टोइंग व्हॅन समोर निघून गेली. थोड्याच अंतरावर असलेल्या फ्लायओव्हरजवळ टोइंग व्हॅनवरील एक युवक रॉड घेऊन उभा होता. त्याने रिक्षा जवळ येताच रॉडने जोरदार वार केला. हा वार युवतीच्या मांडीवर बसून तिला जबर दुखापत झाली. महत्त्वाचे म्हणजे, हा संपूर्ण प्रकार घडत होता, त्या वेळी वाहतूक पोलिसांचा एक कर्मचारी टोइंग व्हॅनमध्ये बसून होता. या वाहतूक पोलिसाने टोइंग कर्मचाºयांना हटकण्याचाही प्रयत्न केला नसल्याचा आरोप युवतीने केला.याची तक्रार देण्यासाठी युवती संध्याकाळी कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोहोचली. घटना पाहता, पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे पोलीस ठाण्यात दाखल झाले. रात्री ११ वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल करून, दुर्वेश राजू जाधव, शमशाद बबलू खान, राकेश कृष्णामोहन झा, रमेश धिरूभाई यांना अटक केली. न्यायालयाने मंगळवारी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.घटना अतिशय गंभीर आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशी केली जाणार असून, कुणाचीही गय केली जाणार नाही, तसेच यापुुढे चारित्र्य पडताळणी करूनच टोइंग पथकात कर्मचाºयांची नेमणूक केली जाणार असून, त्यांचा खासगी तपशीलही तपासला जाईल- सुनील लोखंडे,पोलीस उपायुक्त, ठाणे.

टॅग्स :Crimeगुन्हा