शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ३२३ दिवसांवर, रुग्णवाढीचा वेग ०.२५ टक्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:00 IST

ठाणे  महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख २६ हजार ६८७ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख २१ हजार ४१३ रु ग्णांनी आतार्पयत कोरोनावर मात केली आहे.

ठाणे: मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. यापूर्वी रुग्णवाढीचा वेग हा १.५७ टक्यांवर होता. तोच आता ०.२५ टक्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा अगदी महिनाभरात ५२ दिवसावरून थेट ३२३ दिवसांवर आल्याने ठाणेकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. त्यातही मृत्यूदर रोखण्यातही पालिकेला काहीसे यश आल्याचे दिसून आले असून सध्या मृत्यूदर हा १.४४ टक्यांवर आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णवाढीपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे. (Thane the duration of doubling of patients is 323 days and the rate of growth is 0.25 per cent)

ठाणे  महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख २६ हजार ६८७ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख २१ हजार ४१३ रु ग्णांनी आतार्पयत कोरोनावर मात केली आहे. त्याचे प्रमाण ९५.८४ टक्के इतके आहे. आतापर्यंत १ हजार ८३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या प्रत्यक्षात शहरात ३ हजार ४४४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील १ हजार ११९ रुग्णांना सोम्य लक्षणो आहेत. तर १ हजार ८६२ रुग्णांना कोणत्याही स्वरुपाची लक्षणे नाही. तर ४६३ रुग्ण हे क्रिटीकल असून, २९३ आयसीयू आणि १७० रुग्ण व्हॅन्टीलेटरवर उपचार घेत आहेत. 

महिनाभरापूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी शहरात प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६ हजार ५ इतकी होती. त्यावेळेस रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के इतके होते. परंतू गेल्या महिनाभरात ठाणे महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे करोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला असून त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होऊन ते आता ९५.८४ टक्के इतके झाले आहे. असे असतानाच दुसरीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीतदेखील कमालीचा फरक पडल्याचे दिसून आले आहे. १६ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर आला होता. महिनाभरात आता रुग्ण दुपटीचा कालवधी ३२३ दिवसांवर आला असून यामुळे शहरात करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे मागील महिनाभरात कोरोनावर मात करणाऱ्या  रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा अधिक असल्याचेही दिसून आले आहे. मागील १० दिवसात शहरात ३ हजार ४४९ नवे रुग्ण आढळले असले तरी याच कालावधी दुप्पट रुग्णांनी म्हणजेच ६ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे निश्चितच ही ठाणेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे.तारीख - नवे रुग्ण - बरे झालेले रुग्ण०९ मे - ४७९ -   ९६१०९ मे - ४०६ -   ८५३१० मे - ३८८ - ६८५११ मे - २९० -  ७२३१२ मे - ४०९ -   ७४६१३ मे - ३३९ -  ५०८१४ मे - ३२५  - ५४७१५ मे - ३०६ - ७०६१६ मे - २७४ - ५९६१७ मे - २३३ - ४३७----------------------एकूण - ३४४९-  ६७६२ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे