शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Thane: खड्ड्यांमुळे पुन्हा वाहतुक कोंडीचा ताप, भाजपचे खासदारही अडकले कोंडीत

By अजित मांडके | Updated: August 18, 2022 16:18 IST

Thane: ठाणे शहरात मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे महापालिका हद्दीसह इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सलग तिस-या  दिवशी देखील वाहतुक कोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले.

- अजित मांडकेठाणे - शहरात मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे महापालिका हद्दीसह इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सलग तिस-या  दिवशी देखील वाहतुक कोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले. गुरूवारी सकाळपासूनच पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूल ते माजीवडा आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व द्रुतगती महामार्गावर टेम्पो बंद पडल्याने तर खारेगाव टोलनाका येथे खड्डे भरणीमुळे मुंब्रा बायपास मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीचा फटका भाजपचे धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना देखील बसल्याचे दिसून आले.

मागील काही दिवसापासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने शहराच्या विविध भागात रस्त्यांना खड्डे पडले आहेत. किंवा आधीपेक्षा खडय़ांची संख्या वाढली आहे. तसेच खडय़ांचा आकारही मोठा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाणे, भिवंडी, कल्याण येथून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. या मार्गिकेवर सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास कोपरी रेल्वे पूलावर एक टेम्पो बंद पडला. त्यामुळे कोपरी रेल्वे पूल ते माजीवडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळी कामानिमित्ताने मुंबईत निघालेल्या वाहन चालकांचे यामुळे हाल झाल्याचे दिसून आले. तर खारेगाव टोलनाका येथे खड्डे भरणीच्या कामांमुळे मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खारेगाव टोलनाका ते मुंब्रा बायपास मार्ग, वाय जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यात दुपारी या कोंडीचा फटका धुळ्याचे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना देखील बसल्याचे दिसून आले. ते देखील ज्युपीटर रुग्णालयासमोरील हायवेवर अडकल्याचे दिसून आले.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी