शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

ठाण्यातील घरगुती नळांनाही बसणार मे महिनाअखेरपर्यंत मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 03:56 IST

स्मार्ट मीटरचा प्रयोग : पाणी गळती आणि चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न

ठाणे : आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमीआॅटोमेटीक मीटर अशा पद्धतीने मागील १२ वर्षे पालिकेने नळसंयोजनांवर मीटर बसवण्यासाठी विविध पद्धतीने निविदा काढल्या होत्या. परंतु, अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता स्मार्ट मीटर बसवले जाणार असून पालिकेने काढलेल्या निविदेला प्रतिसाददेखील मिळाला आहे. त्यानुसार, आता बल्कस्वरूपात व्यावसायिक वापराच्या नळसंयोजनांवर मीटर बसवण्याचा प्रयोग पालिकेमार्फत सुरू झाला आहे. त्यानुसार, मे अखेरपर्यंत घरगुती वापराच्या नळसंयोजनांवरदेखील मीटर बसवण्यास सुरुवात होईल, असा दावा पालिकेने केला आहे.

पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरूपाचे, परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसवण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु, तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. मधल्या काळात तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी ही योजनाच गुंडाळली होती. दरम्यान, पुन्हा एआरएमचे सेमीआॅटोमेटीक मीटर बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, या कामाच्या निविदा मागील वर्षी मागवण्यात आल्या होत्या. हे रोल मॉडेल पीपीपी तत्त्वावर राबवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. या योजनेच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही, प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर, या कामासाठी स्मार्ट सिटीतून खर्च करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि या कामासाठी १०४.५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या बैठकीत या मीटरचा बोजा ठाणेकरांवर पडू नये, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, स्मार्ट मीटरचा मार्ग मोकळा झाला आणि ठाणे महापालिका स्मार्ट सिटीतून ७० टक्के आणि ३० टक्के खर्च स्वत: उचलणार आहे.पहिल्या टप्प्यात १३ हजार स्मार्ट मीटरआता एक लाख १३ हजार स्मार्ट मीटर पहिल्या टप्प्यात बसवले जाणार असून यामध्ये इमारतींचा समावेश असणार आहे. त्यानुसार, आता या प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक वापराच्या नळसंयोजनांवर २० ठिकाणी अशा स्वरूपाचे मीटर बसवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास टप्प्याटप्प्याने इतर सर्व व्यावसायिक नळसंयोजनांवर अशा स्वरूपाचे मीटर बसवले जाणार आहेत. त्यानंतर, इमारतींना मीटर बसवले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार, घरगुती वापराच्या नळसंयोजनांवर तीन महिन्यांत हे मीटर टप्प्याटप्प्याने बसवले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

टॅग्स :WaterपाणीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका