शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे ते दिवा रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूचे रूपडे पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 16:35 IST

ठाणे - दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश. साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे चित्र.

ठाणे - दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश. साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे चित्र. पण हे चित्र आता बदलणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा चक्क रेल्वेने प्रवास करून रेल्वेच्या दुतर्फा असलेला कचरा साफ करून तिथे रंगरंगोटी आणि पेंट दि वॉल मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशा पद्धतीने राबविण्यात येणारा भारतातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.आज दुपारी दीडच्या सुमारास जयस्वाल यांनी महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक पूर्वेश सरनाईक, मुंबईच्या प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर रुबल नागी, प्रसिद्ध चित्रकार किशोर नादावडेकर, वास्तुविशारद प्रवीण जाधव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लोकल ठाण्यात पकडून दिवा स्थानकापर्यंत प्रवास केला.या लोकल प्रवासात त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पडलेला कचरा साफ करणे, झोपडपट्टयाच्या बाजूला पडलेला कचरा उचलणे, तिथे रंगरंगोटी करणे, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत त्या ठिकाणी पेंट दी सिटी वॉल या मोहिमेच्या धर्तीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे.यावेळी बोलताना जयस्वाल म्हणाले की, इंडोनेशियामधील कँगपूंग पीलंग, पोलंडमध्ये झलिपी, स्पेनमध्ये जुझकार, ब्राझिलमध्ये रियो आणि मेक्सिकोमधील पचुकास लास पल्मितास या गावांची संपूर्ण रंगरंगोटी करून त्या गावांना आकर्षक बनविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पेंट दि सिटी वॉल या मोहिमेच्या दुस-या टप्प्यात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान आकर्षक रंगरंगोटी करण्यात येणार आहे. जेणेकरून ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा प्रवास करणा-या प्रवाशांना प्रसन्नता वाटेल. याच धर्तीवर रूपादेवी पाड्याचा विकास करणार असल्याचेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.या महत्वाकांक्षी योजनेसाठी सर्वेक्षण करून संकल्पचित्र आणि कृती आराखडा एका महिन्यात तयार करून काम सुरू करणार असल्याचे सांगून जयस्वाल यांनी या नवीन मोहिमेमुळे ठाणे ते दिवा या रेल्वेच्या दोन्ही बाजूचे आजचे जे रूप आहे ते नक्कीच बदलेल, अशी आशा व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे