शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ठाणे जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांची बुधवारी सामूहीक रजा; शनिवारी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 20:45 IST

 महाराष्ट्र  राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पाटील यांना निवेदन देऊन २८ ते ५ सप्टेंबर या कालावधीतील तीन दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्याच्या सामुदयीक रजेच्या धरणे आंदोलनात जिल्ह्यात शेकडो कर्मचारी सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देनायब तहसीलदारांना ग्रेड पे मात्र वर्ग तीनचालिपिकाचे नाव बदलून महसूल सहाय्यक असे नामकरणरक्तदान करून राज्य शासनाचा जाहीर निषेध करणार

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार आॅफिस, तलाठी कार्यालये आदी ठिकाणी कार्यारत असलेले महसूल कर्मचारी २८ आॅगस्ट रोजी सामूहीक रजा घेऊन धरणे आंदोलन छेडणार आहे. यामुळे नागरिकांचे विविध कामे रखडणार आहे. तर ३१ आॅगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संपाचा इशाराही या महसूल कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना आज निवेदनाव्दारे दिला आहे.         महाराष्ट्र  राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पाटील यांना निवेदन देऊन २८ ते ५ सप्टेंबर या कालावधीतील तीन दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्याच्या सामुदयीक रजेच्या धरणे आंदोलनात जिल्ह्यात शेकडो कर्मचारी सहभागी होणार आहेत. यानंतर शनिवारच्या एक दिवशीय लाक्षणिक संपाच्या कालावधीत कर्मचारी रक्तदान करून राज्य शासनाचा जाहीर निषेध करणार आहे. यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास या कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वाघचौडेसह मुख्य सल्लागार भास्कर गव्हाळे यांनी लोकमतला सांगितले.        राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा दिलेल्या नायब तहसीलदारांना ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला जात आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी ग्रेडपे चार हजार ६०० रूपये करण्यात यावे, लिपिकाचे नाव बदलून महसूल सहाय्यक असे नामकरण करावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाणे ३३ टक्के ऐवजी २० टक्के करा, अव्वल कारकूनच्या वेतन श्रेणीमधील त्रृटी दूर करा,दांगट समितीनुसार पदे मंजूर करा, इतर विभागांच्या कामासाठी नव्याने आकृती बंध तयार करा आदी १८ प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसाठी आता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारीEmployeeकर्मचारी