शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदानामध्ये ठाणे जिल्ह्याची कामगिरी अंधकारमय; गैरसमज, सरकारच्या उदासीनतेचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:52 IST

देशपातळीवर गेल्यावर्षी ५१ हजार २४९ नेत्रदान झाले, त्यातील २७ हजार ५५९ बुबुळांचाच उपयोग झाला.

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे - रक्तदानाला जेवढा सकारात्मक प्रतिसाद मिळतो तेवढे गांभीर्याने नेत्रदानाकडे पाहिले जात नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट दिसते. गेल्यावर्षी ठाण्यात केवळ ६२० नेत्रदान झाले. त्यातील ४८८ बुबुळांचा वापर झाला. सहियारा नेत्रपेढीने ही माहिती दिली. राज्य व देश पातळीवरही अशी उदासीनता असल्याचा दावा नेत्रपेढीने केला.

‘डोळे द्या, अंधार नाहीसा करा’ असे आवाहन सहियारा नेत्रपेढी करते. महाराष्ट्रासह देशभरात दरवर्षी दीड ते दोन लाख नेत्रांची गरज असते. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात केवळ दोन हजार ४९७ नेत्रदान झाले, त्यापैकी एक हजार ५२४ बुबुळांचा वापर केला. देशपातळीवर गेल्यावर्षी ५१ हजार २४९ नेत्रदान झाले, त्यातील २७ हजार ५५९ बुबुळांचाच उपयोग झाला.

...तर २४ तासांतही नेत्रदान शक्य ‘लोकांना वाटते की, मृत व्यक्तीचा पूर्ण डोळा काढला जातो, पुढच्या जन्मी अंधत्व येते. मृत्यूनंतर ६ ते ८ तासांच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेला केवळ अर्धा तास अवधी लागतो. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत मृतदेह बर्फात ठेवला, तर २४ तासांतही नेत्रदान शक्य आहे, असे सहियारा नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका सुप्रिया हिरवे यांनी सांगितले. 

‘नेत्रदानासाठी जनजागृती ही फक्त कागदोपत्री राहिली आहे. मृत्युप्रमाणपत्रावर नेत्रदानाची चौकट असली तरी सरकारी- खासगी रुग्णालयांत कर्मचारी हे व्यक्तीच्या कुटुंबीयांना नेत्रदानाविषयी प्रोत्साहित करीत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. शासनानेच गांभीर्याने पुढाकार घेतला नाही, तरच नेत्रदानाचे प्रमाण वाढणार नाही. दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी ‘नेत्रदान पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो. मात्र, या १५ दिवसांत सरकारकडून प्रत्यक्षात किती जनजागृती होते याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.  

जीवनदायी देणगीअंधकारमय जीवन जगणाऱ्या लाखो लोकांना दृष्टी देण्याची संधी वाया जाऊ नये, यासाठी आता सरकारने आणि समाजानेही नेत्रदानाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. नेत्रदानाची प्रक्रिया ना जटिल आहे ना वेळखाऊ, उलट ती एका अंध व्यक्तीला नवीन दृष्टी देणारी जीवनदायी देणगी ठरते, असा विश्वास हिरवे यांनी व्यक्त केला.