शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

ठाणे जिल्ह्यातील १५ हजार कोटींच्या दोन्ही मेट्रो तीन वर्षात धावणार

By सुरेश लोखंडे | Updated: December 16, 2018 17:53 IST

या मेट्रो प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा कल्याणला होईल. या ‘ठाणे - कल्याण - भिवंडी ’ या २४.९ किलो मीटर (किमी.) मेट्रोच्या कामासाठी आठ हजार ४१६.५१ कोटी रूपये तर ‘दहीसर - मिरा भार्इंदर’ या १०.३ किमी.च्या मेट्रोवर सहा हजार ६०७ कोटीं खर्चाचे आंदाजपत्रक तयार केले आहे. या १५ हजार २३ कोटींचे दोन्ही प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्यात येत आहेत. त्यासाठी आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन सोहळा पंतप्रधानांच्या हस्त आहे. एमएमआरडीएच्या नियंत्रणातील हे केंद्र शासनाचे दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्प २०२१ पूर्ण होऊन मेट्रो धावणार

ठळक मुद्दे‘ठाणे - कल्याण - भिवंडी ’ या २४.९ किलो मीटर (किमी.) मेट्रोच्या कामासाठी आठ हजार ४१६.५१ कोटी रूपये ‘दहीसर - मिरा भार्इंदर’ या १०.३ किमी.च्या मेट्रोवर सहा हजार ६०७ कोटीं खर्चाचे आंदाजपत्रक सुरूवातीच्या काळात दोन स्टेशनमधील प्रवास अवघ्या पाच मिनिटांच्या स्पीडने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

सुरेश लोखंडेठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-कल्याण- भिवंडी मेट्रो लाइन - ५ व दहीसर (पूर्व) -मीरा भाईंदर मेट्रो लाइन ९ या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन मंगळवारी आहे. सुमारे १५ हजार २३.५१ कोटीं रूपये खर्चाचे हे दोन्ही प्रकल्प आगामी तीन वर्षात म्हणजे २०२१ ला पूर्ण होऊन मेट्रो सुसाट धावणार आहे. त्यासाठी या प्रकल्पांचे कामे एमएमआरडीएने युध्दपातळीवर हाती घेऊन नूतन वर्षात त्यास प्रारंभ होईल.या मेट्रो प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा कल्याणला होईल. या ‘ठाणे - कल्याण - भिवंडी ’ या २४.९ किलो मीटर (किमी.) मेट्रोच्या कामासाठी आठ हजार ४१६.५१ कोटी रूपये तर ‘दहीसर - मिरा भाईंदर या १०.३ किमी.च्या मेट्रोवर सहा हजार ६०७ कोटीं खर्चाचे आंदाजपत्रक तयार केले आहे. या १५ हजार २३ कोटींचे दोन्ही प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्यात येत आहेत. त्यासाठी आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन सोहळा पंतप्रधानांच्या हस्त आहे. एमएमआरडीएच्या नियंत्रणातील हे केंद्र शासनाचे दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्प २०२१ पूर्ण होऊन मेट्रो धावणार आहे.‘ठाणे - कल्याण - भिवंडी ’ या लाइनवर धावणाऱ्या मेट्रोला सहा डब्बे (कोच) जोडले जाणार आहेत. एक मीटरच्या जागेत सुमारे सहा प्रवाशांची आसन व्यवस्था निश्चित केली आहे. एका वेळी सुमारे एक हजार ७५६ प्रवासी घेऊन ही मेट्रो धावणार आहे. एक तासाच्या कालावधीत २०२१ ला सुमारे १७ हजार ९५७ प्रवासी प्रवास करणार आहेत. तर २०३१ पर्यंत २६ हजार १४३ प्रवास्यांना या मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे. या मेट्रोला दर दिवशी २०२१ ला दोन लाख २९ हजार रूपये तर २०३१मध्ये तीन लाख २५ हजार रूपये उत्पन्न मिळणार आहे. २०३१ पर्यंत ही मेट्रो आठ डब्यांव्दारे प्रवासी सेवा देणार आहे.या मेट्रोचे १७ स्टेशन निश्चित केले असून प्रत्येक स्टेशन दरम्यानचा प्रवास केवळ चार मिनिटात होईल. तर सुरूवातीच्या काळात दोन स्टेशनमधील प्रवास अवघ्या पाच मिनिटांच्या स्पीडने होणार आहे. या मेट्रोच्या २४ किमी. प्रवासा दरम्यान कल्याण एपीएमसी मार्केटपासून ते कल्याण मेट्रो स्टेशन, सहाजानंदचौक, दुर्गाडी फोर्ट, आधारवाडी, गोवेगाव एमआयडीसी,राजनोली, टेमघर, गोपाळ नगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पुर्णा, कोलशेत, कशेळी, बाळकूम नाका आणि कापूरबावडी आदी प्रमुख १७ स्टेशन आहेत. या मेट्रोसाठी कोनगाव एमआयडीसी परिसरात १५ हेक्टरचे कारशीड बांधले जाणार आहे. त्यानंतर सुमारे नऊ हेक्टर खाजगी जागा अधिक लागणार आहे. त्यात ३.२५ हेक्टर या जादा जागेसह सहा हेक्टर जागा बांधकामाच्या कालावधीत तात्पुरती लागणार आहे.ठाणे परिसरातील या मेट्रोप्रमाणेच ‘दहीसर (पूर्व) ते मिरा भाईंदर ’ या १०.३ किमी.च्या मेट्रो प्रवासामध्ये आठ स्टेशन आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार ६०७ कोटी रूपये किंमतीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम, व्यवस्थापन आणि नियोजनावर राज्य शासन आणि एमएमआरडीएकडून सुमारे चार हजार ९६७.७५ कोटीं रूपये खर्च होईल. हा संपूर्ण प्रकल्प तयार होईपर्यंत सुमारे एक हजार ६३९.२५ कोटींच्या खर्चाचे नियोजन आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे १४२ बैठका घेण्यात आल्या आहेत. सुरूवातीला सहा डब्यातून सुमारे एक हजार ७५६ प्रवास या मेट्रोतून जाणार आहे. त्यानंतर आठ या मेट्रोला राहणार असून त्यातून दोन हजार २४४ प्रवासी एकावेळी प्रवास करणार आहेत. यानुसार २०२१ला या मेट्रोतून २४ हजार ५८५ तर २०३१पर्यंत सुमारे ३० हजार ३८९ प्रवासी एका तासादरम्यान प्रवास करणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMetroमेट्रोkalyanकल्याण