शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धवजी, गणेशोत्सवाबद्दलची ठोस भूमिका जाहीर करून मार्ग मोकळा करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:33 IST

ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे: आगामी गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने आपली ठोस भूमिका जाहीर करावी आणि उत्सवांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम गणेशोत्सव मंडळांनी व मूर्तिकारांनी केली आहे. याबाबत ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसे पत्र लिहिले आहे. मागील वर्षाची कोरोना परिस्थिती व या वर्षाची परिस्थिती यामध्ये खूप फरक पडला आहे. यावर्षी लस उपलब्ध झाली आहे. किमान २५% लसीकरण झालेले आहे व राहिलेले ७५% लसीकरण पुढील काही महिन्यात प्रशासन आपल्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पूर्ण करेल. मागील वर्षी गणेशोत्सवाबाबत निर्णय हा खूप उशिरा घेतल्यामुळे मूर्तिकारांचे खूप मोठे नुकसान झाले होते व गणेशोत्सव मंडळांनादेखील खूप त्रास सहन करावा लागला होता. तरी देखील सर्व प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो होते असे समितीने या पत्रात म्हटले आहे.यावर्षी आपण संपूर्ण मंडळांना विश्वासात घ्याल व मागील वर्षाची बंधने तसेच मूर्तीच्या उंची बाबत असलेली बंधने हटवून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यास आम्हाला संपूर्ण सहकार्य कराल असा आम्हाला विश्वास आहे असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी म्हटले आहे. सर्व गणेशोत्सव मंडळे प्रशासनाला सहकार्य करत आली आहेत आणि पुढेही करत राहतील. तसेच, भविष्यात यदाकदाचित तशीच कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्धभवलीच तर प्रशाशन व मंडळे मिळून योग्य मार्ग काढतील व संपूर्ण सहकार्य शासनास करून खंभीरपणे आपल्या सोबत उभे राहतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.  

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे