शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी दिव्यांग - जेष्ठांना ने-आण करणाऱ्या बसमधून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:44 IST

मतदानाच्या २९ एप्रिल रोजी जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करून त्यांचा हक्क बजवावा. जिल्ह्यात सात हजार ९४५ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये,म्हणून त्यांना जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर आदी शहरांमध्ये निवडणूक यंत्रणेने बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शहरात २० बसेस व ग्रामीण भागात ७४० रिक्षांची मोफत सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. या बससेचे संबंधीत मतदान केंद्रांजवळ बस थांबे ही निश्चित केले

ठळक मुद्देजिल्ह्यात सात हजार ९४५ दिव्यांग मतदार आहेतजिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शहरात २० बसेस व ग्रामीण भागात ७४० रिक्षांची मोफत सेवा बस किंवा रिक्षा उपलब्ध न झाल्यास दिव्यांग मतदारांनी १९५० या हेल्पलाइनवर तत्काळ

ठाणे : मतदानाच्या दिवशी दिव्यांगाना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी जिल्ह्यातील शहरांमध्ये मोफत बसेस व ग्रामीणमध्ये रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांजवळ बस थांब्यांचे निश्चित केले आहेत. या बस मार्गांची पाहाणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वत: या दिव्यांग मतदारांच्या बसमध्ये बसून शहरातील मतदार केंद्रांच्या बस थांब्यांचा आढावा शनिवारी सायंकाळी घेतला. मतदानाच्या २९ एप्रिल रोजी जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करून त्यांचा हक्क बजवावा. जिल्ह्यात सात हजार ९४५ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये,म्हणून त्यांना जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर आदी शहरांमध्ये निवडणूक यंत्रणेने बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शहरात २० बसेस व ग्रामीण भागात ७४० रिक्षांची मोफत सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. या बससेचे संबंधीत मतदान केंद्रांजवळ बस थांबे ही निश्चित केले आहेत, असे नार्वेकर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर पत्रकारांसह त्यांनी दिव्यांग मतदारांच्या या बसेस मध्ये बसून मतदान केंद्राजवळ निश्चित केलेल्या बस थांब्यांची देखील प्रत्येक्ष पाहाणी केली. जिल्हाधिका-यांसमवेत या बसमध्ये दिव्यांग मतदारांचे आयकॉन अशोक भोईर, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी, नोडल अधिकारी रेवती गायकर, आरटीओ अधिकारी व दिव्यांगाना मतदानाच्या दिवशी सेवा देण्यासाठी तत्पर राहणारे नोडल अधिका-यांचा देखील समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून निघालेली ही बस एम्प्लॉयमेंट आफिसजवळील आठ मतदान केंद्रांच्या थांब्यासह सेंट जॉन्स हायस्कूल जवळील चार केंद्र, दगडी शाळा, महाराष्ट्र विद्यालय न्यू इंग्लीश स्कूल आदी ठिकाणी असलेल्या २४ मतदान केंद्रांच्या बस थांब्यांचा आढावा यावेळी जिल्हाधिका-यांनी घेतला. सुमारे ४० मिनीटांच्या प्रवासात एक बस ६७ मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदार व जेष्ठ नागरिक मतदारांना ने आण करणार आहेत. अशा २० बसेस ठिकठिकाणच्या शहरात धवणार आहेत. तर ग्रामीण भागात या मतदारांसाठी ठिकठिकाणी ७४० रिक्षा धावणार आहेत. बस किंवा रिक्षा उपलब्ध न झाल्यास दिव्यांग मतदारांनी १९५० या हेल्पलाइनवर तत्काळ संपर्क साधून वाहन उपलब्ध करून घेता येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक