‘मतदान’ प्रोत्साहनासाठी धावताहेत घंटागाड्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:20 AM2019-04-20T00:20:59+5:302019-04-20T00:21:14+5:30

नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत.

'Voting' is running to encourage gambling! | ‘मतदान’ प्रोत्साहनासाठी धावताहेत घंटागाड्या!

‘मतदान’ प्रोत्साहनासाठी धावताहेत घंटागाड्या!

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे : नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात जिल्ह्णातील सहा महापालिकांनादेखील सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडून दररोज कचरा घेण्यासाठी शहरभर धावणाऱ्या ५२७ घंटागाड्यांद्वारे नागरिकांना, महिलांना आणि युवकयुवतींना आॅडिओ क्लिप ऐकवली जात आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून होत आहे.
जिल्ह्णातील मतदानाची टक्केवारी वाढावी, कमीतकमी ७० टक्के मतदान १८ विधानसभा मतदारसंघांत व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती करून ‘मतदान’ करण्यासाठी आवाहन करणारे उपक्रम हाती घेतले. याप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या महापालिका प्रशासनासदेखील निवडणूक यंत्रणेने आदेश जारी करून ‘मतदान’ टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप उपक्रम दिले आहेत. यास अनुसरून रोज कचरा घेण्यासाठी गल्लीगल्लींत धावणाºया घंटागाड्यांवर स्पीकर लावले आहेत. या स्पीकरद्वारे नागरिकांना आॅडिओ कॅसेट ऐकवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून जिल्हा निवडणूक यंत्रणेकडे केला असल्याचे ‘मतदान’ जनजागृती स्वीप उपक्रमांच्या नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी लोकमतला सांगितले.
शहरातील घराघरांतील कचरा गोळा करण्याच्या दैनंदिन कामासह महापालिकांच्या घंटागाड्या मतदारांना २९ एप्रिलच्या त्यांच्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत आहेत. या गाड्यांना लावलेल्या स्पीकरमधील मंजूळ आवाजासह गीतांच्या माध्यमातून ‘मतदान’ हक्क बजावण्याचे आवाहन महिलावर्गांसह परिवारातील नागरिकांना करत आहेत. यासाठी ठाणे शहरात सर्वाधिक १५० घंटागाड्या रोज सकाळ, दुपारच्या त्यांच्यावेळेत धावत आहेत. याखालोखाल कल्याण-डोंबिवली मनपाच्या शहरांमध्ये १४० घंटागाड्या मतदानाची जाणीव करून देत आहेत. याशिवाय, नवी मुंबईला ११९, अंबरनाथला ५६ भिवंडी, ५४ तर उल्हासनगर शहरात आठ घंटागाड्या धावत आहेत.
>‘मतदान’ हक्काची जाणीव लोकचळवळ व्हावी
गेल्या लोकसभा निवडणुकीला जिल्ह्णातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातच सर्वात कमी अवघे ३८ टक्के म्हणजे अत्यल्प मतदान झाल्याची नोंद आहे. यापेक्षा एक टक्का जास्त अंबरनाथला ३९ टक्के फारच कमी मतदान झाल्याची नोंद आहे. यामुळे येथील ‘मतदान’ हक्काची जाणीव जनजागृतीऐवजी लोकचळवळ होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: 'Voting' is running to encourage gambling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.