शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भिवंडीच्या चिंबीपाडा परिसरातील खाजगी विहिरींच्या स्वच्छतेचे ठाणे जि.प.च्या सीईओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 18:40 IST

दूषित पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रो झालेल्या या मजुरांवर भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी  जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या ताफ्यासह रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच पसिरातील खाजगी विहिरींची स्वच्छता करण्याचे आणि मजुरांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आदेश

ठळक मुद्देदूषित पाणी असल्याची जाणीव स्थानिक आरोग्य अधिका-यांना असणे अपेक्षित पाण्याच्या शुद्धीकरणासाठी घरोघर मेडिक्लोअरचे वाटप होणे अपेक्षितदूषित पाण्याच्या माहितीअभावी पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये चर्चा

ठाणे : भिवंडीच्या चिंबीपाडा गावालगत वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना दोन दिवसांपूर्वी गॅस्ट्रोची लागण झाली. विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रो झालेल्या या मजुरांवर भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी  जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या ताफ्यासह रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच पसिरातील खाजगी विहिरींची स्वच्छता करण्याचे आणि मजुरांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिले.या गॅस्ट्रोच्या लागणमुळे एका मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांची भीमनवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उपचारार्थ दाखल रु ग्णांची तब्येत सुधारत असल्याचा निर्वाळा येथील डॉक्टरांनी दिला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे, स्वच्छता व पाणीपुरवठा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानसी बोरकर, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते आदी उपस्थित होते. परिसरातील विहिरींमध्ये दूषित पाणी असल्याची जाणीव स्थानिक आरोग्य अधिका-यांना असणे अपेक्षित आहे. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी घरोघर मेडिक्लोअरचे वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र, जनजागृती व विहिरीतील दूषित पाण्याच्या माहितीअभावी पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये बोलले जात आहे.चिंबीपाडा येथील वीटभट्टीवर जाऊन भीमनवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील पाण्याच्या स्रोतांची पाहणी करून त्यांनी दोन खाजगी विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर न करण्याची नोटीस वीटभट्टी मालकाला बजावली आहे. मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने खाजगी विहिरीतील पाण्याची स्वच्छता तत्काळ करण्याचे आदेश भीमनवार यांनी ग्रामपंचायतीला दिले. याशिवाय, वीटभट्टी कामगारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचेही त्यांनी आरोग्य विभागास सूचित केले. गॅस्ट्रोचा धोका इतर गावांना होऊ नये, याकरिता चिंबीपाडा वीटभट्टीसह आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक घरी आरोग्याची खबरदारी घेणारे मार्गदर्शनही त्यांनी उपस्थितांना केले.

 

 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद