शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४३२ रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ४३२ रुग्ण शनिवारी आढळले असून, १८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ४३२ रुग्ण शनिवारी आढळले असून, १८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख ३० हजार ७२० बाधितांची नोंद झाली असून, मृतांची संख्या दहा हजार ६२९वर गेली आहे.

ठाणे शहरात ८६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख ३२ हजार ९४२ झाली. शहरात एक मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या दोन हजार तीन नोंदण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत ९३ रुग्णांची वाढ झाली असून, एक मृत्यू झाल्याने आता एक लाख ३५ हजार ९९४ रुग्णांसह दोन हजार ५८७ मृत्यूंची नोंंद झाली.

उल्हासनगरला सहा रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले. येथे आता २० हजार ७४७ बाधितांसह ४९५ मृतांची नोंद आहे. भिवंडीला तीन बाधित असून, एकही मृत्यू नाही. येथे आता १० हजार ६०२ बाधित असून, मृतांची संख्या ४५६ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये ४२ रुग्ण आढळले असून, दोन मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ५० हजार ४५८ असून, मृतांची संख्या एक हजार ३२८ झाली.

अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळल्याने आता बाधित १९ हजार ६८१ झाले असून, तीन मृत्यू झाले आहेत. येथील मृत्यूची संख्या ५१० झाली आहे. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित २१ हजार १३ झाले आहेत. येथे एकही मृत्यू झालेला नसल्याने मृत्यूंची संख्या ३४० आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ४९ रुग्णांची वाढ झाली असून, तीन मृत्यू झाले. आता बाधित ३९ हजार ४९, तर आतापर्यंत एक हजार १७६ मृत्यू झाले आहेत.