शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफच्या धर्तीवर आता ‘ठाणे आपत्ती प्रतिसाद दल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:19 IST

पावसाळ्याच्या काळात किंवा एखादी इमारत दुर्घटना घडली तर, वारंवार एनडीआरएफला पाचारण करावे लागते. मात्र, त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर लागतो.

ठाणे : पावसाळ्याच्या काळात किंवा एखादी इमारत दुर्घटना घडली तर, वारंवार एनडीआरएफला पाचारण करावे लागते. मात्र, त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर लागतो. त्यामुळे आता एनडीआरएफच्याच धर्तीवर स्वत:चे ‘ठाणे आपत्ती प्रतिसाद दल’ स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला. या टीममध्ये ५० जणांचा चमू असणार आहे.पावसाळ्यातील आपत्ती किंवा इमारत दुर्घटना असो, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी मे २०१४ मध्ये मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा आणि आजूबाजूच्या भागासाठी एनडीआरएफच्या टीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि कोकण विभागीय आयुक्तांवर सोपवण्यात आली होती.यामध्ये या टीमच्या राहण्याची व्यवस्था, त्यांचे खानपान, यंत्रसामग्री ठेवण्यासाठी जागा आदींसह इतर महत्त्वाच्या बाबींचा अंतर्भाव होता. परंतु, त्याला तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप ठाण्यात ही टीम कायमस्वरूपी प्राप्त झालेली नाही. दरम्यान, पालिकेने या टीमसाठी ठाण्यात जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आता एनडीआरएफच्या धर्तीवरच ठाण्यात टीडीआरएफ (ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी झालेल्या अधिकारी परिषदेच्या पहिल्या दिवशी घेतला. महसूल विभागाच्या धर्तीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रात प्रथमच सुरू केलेल्या महापलिका अधिकारी परिषदेची सुरुवात शुक्रवारी झाली. नागरी संशोधन केंद्र ठाणे येथे ही परिषद दोन दिवस चालणार असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तिचे अनौपचारिक उद्घाटन केले.दरम्यान, या टीडीआरएफमध्ये उपायुक्त, आपत्कालीन व्यवस्थापन, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि माहिती व जनसंपर्कअधिकारी महेश राजदेरकर यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून या समितीने टीडीआरएफची रचना कशी असेल, किती मनुष्यबळ असावे, काय यंत्रसामग्री असावी, याविषयीचा मसुदा एक आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले.विभागीय आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अधिक समृद्ध करणे, या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करणे, प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणे आदी गोष्टींचा टीडीआरएफसाठी प्रामुख्याने विचार करण्यात येणार असून निवृत्त लष्करी अधिकारी यांची या कक्षासाठी नियुक्ती करण्याची प्रक्रि या सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.प्रशिक्षित उमेदवारांमध्ये आर्मी किंवा पोलीस दलातील प्रतीक्षायादीवरील पात्र उमेदवारांचा यासाठी विचार करता येईल का, याचा निर्णय घेण्यात येईल. शहरात कुठेही आपत्कालीन घटना घडल्यास मदतकार्यासाठी या प्रशिक्षित आणि अत्याधुनिक यंत्रणांनी युक्त कक्षाचा निश्चित उपयोग होणार असल्याचेही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका