शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 15:18 IST

त्यावर उपाय नसल्याने ठाणेकरांनो खड्डे पहा आणि थंड बसा अशी टीकाही पालिका आणि सत्ताधा-यांवर केली जात आहे.

ठाणे  : सध्या ठाणे  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची चर्चा सर्वच पातळीवर सुरू आहे. पालिका तात्पुरत्या स्वरुपात मुलामा लावून खड्डे बुजवित असली तरी पुन्हा खड्डे पडत असल्याचे चित्र शहरातील बहुतेक भागात आहे. त्यामुळे तलावांचे शहर असलेल्या शहरांची ओळख ही आता खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. त्यात आता खड्ड्यांचे ठाणे  हेच स्मार्टसिटीचे रडगाणे अशा आशयाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे वायरल होऊ लागला आहे. परंतु त्यावर उपाय नसल्याने ठाणेकरांनो खड्डे पहा आणि थंड बसा अशी टीकाही पालिका आणि सत्ताधा-यांवर केली जात आहे.दरवर्षी पावसाळा सुरु झाला की शहरातील खड्ड्यांची चर्चा सुरू होते. यंदा तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर शहरातील अर्थव्यवस्था सुरळीत सुरु झाली आहे. परंतु ही अर्थव्यवस्था टप्याटप्याने रुळावर येत असताना शहरातील खड्ड्यांना स्पीड मात्र जोरात असल्याचे दिसून आले. शहरातील कापुरबावडी, माजिवडा, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा, तिनहात नाका, नितीन कंपनी कॅडबरी आदींसह शहरातील जवळ जवळ प्रत्येक भागात रस्त्यांवर खड्डेच दिसत आहेत. त्यात सध्या ठाणो शहर हे स्मार्टसिटीकडे वाटलाच करीत आहे. परंतु स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत असताना ठाणेकारांना किमान रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येंतून तरी सोडवा अशी माफक अपेक्षा आहेत. परंतु दरवर्षी येतो पावसाळा तसे दरवर्षी पडतात खड्डे असेच चित्र ठाण्यात आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कडे वाटचाल करणा-या ठाण्याची खड्ड्यांची वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.दरम्यान कल्याण डोंबिवलीच्या खडय़ांवरुन मागील काही वर्षे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा झाली होती. त्यात यंदा ठाण्यातही शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी मनसेच्या वतीने शहरातील खड्ड्यांवर व्हिडीओ वायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे, ठाणेकरांनो पहा आणि थंड बसा, अशा आशयाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आज अनेकांची पंसती ही ठाण्याला आहे, अनेकांनी आपले घरे येथे घेतली आहेत. सांस्कृतिक, तलावांचे शहर म्हणूनही ठाण्याला पसंती दिली जात आहे. परंतु आज ही ओळख काहीशी पुसली जाऊन खड्ड्यांचे ठाणे अशी ओळख ठाण्याची झाल्याचा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आता तरी प्रशासन जागे होईल का?, खड्ड्यांपासून ठाणेकरांची मुक्तता होईल का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.