शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हेरॉइनची तस्करी करणा-याला ठाणे गुन्हे शाखेने पकडले, ३९ लाखांचा माल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 21:03 IST

हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणाºया सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली

ठाणे : हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणाºया सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ३९२.५ ग्रॅम वजनाचे ३९ लाख २५ हजारांचे हेरॉइन हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अन्सारी हा हेरॉइन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी स्थानक परिसरात बुधवारी उपनिरीक्षक धर्मराज बांगर, हवालदार जगन्नाथ सोनवणे, महादेव चाबुकस्वार, नाईक बिपेश किणी, अमोल पवार आदींनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये हेरॉइन हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याने मध्य प्रदेशातून हे अमली पदार्थ आणल्याची कबुली दिली. मात्र, ते कोणाकडून आणले, कोणाला विकणार होता, त्याने यापूर्वीही अशी विक्री केली आहे का, या सर्व बाबींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

मुंब्य्रातून नशेची औषधे हस्तगतअन्य एका घटनेत सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाने मुंब्रा भागातून १० आॅक्टोबर रोजी इरशाद मोहमद अझर खान याला मुंब्य्रातील मित्तल मैदान परिसरातून अटक केली. त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररीत्या ठेवलेल्या खोकल्यावरील फेन्सिरेक्स या औषधाच्या ८ हजार ५५० बॉटल्स औषध निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी खान याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.

 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक